अंतिम मतदार यादीनुसार १५ प्रभागांत वाढले मतदार
पिंपरी, ता. १८ ः पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यांवरील हरकती व सूचनांवर सुनावणी झाली. आलेल्या आक्षेपांबाबत घरोघरी जाऊन केंद्रस्तरिय अधिकाऱ्यांनी दुरुस्त्या केल्या. आता प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे प्रारूप मतदारयाद्यांच्या तुलनेत १५ प्रभागांत मतदार वाढ झाली असून, १७ प्रभागांतील मतदार संख्या कमी झाली आहे. मात्र, एकूण १७ लाख १३ हजार ८९१ मतदार संख्या कायम आहे.
प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात, दुबार नावे, नावे व पत्त्यांत बदल, गाळलेले नावे अशा स्वरूपाच्या हरकती व सूचना निवडणूक आयोगाकडे आल्या होत्या. त्यांच्या दुरुस्तीसाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती केल्या होत्या. त्यांच्याकडून घरोघरी जाऊन दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यानुसार अंतिम मतदार याद्या सोमवारी (ता. १५) निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केल्या. त्यानंतर कोणत्या प्रभागात मतदारांची घट झाली, कोणत्या प्रभागात वाढ झाली हे स्पष्ट झाले. शिवाय, काही प्रभागांत पुरुष तर काही प्रभागांत महिला; काही प्रभागांत पुरुष व महिला यांच्या संख्येत वाढ किंवा घट झाली आहे. इतर (तृतीयपंथी) मतदारांचीही हीच स्थिती आहे.
सर्वाधिक संख्येचा प्रभाग बदलला
प्रारूप मतदार यादी जाहीर केली तेव्हा सर्वाधिक मतदार असलेला प्रभाग आता बदलला आहे. प्रारूप मतदार यादीनुसार सर्वाधिक ७४,३४० मतदार असलेला प्रभाग क्रमांक एक पाटीलनगर, सानेवस्ती, म्हेत्रेवस्ती होता. तर, सर्वात कमी ३४ हजार ७६५ मतदार प्रभाग क्रमांक २३ थेरगाव, पवारनगर होता. आता दुरुस्ती करून अंतिम मतदार यादीत सर्वाधिक ७५ हजार १०५ मतदार प्रभाग क्रमांक १६ रावेत, किवळे, मामुर्डीमध्ये आहेत. तर, सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक २३ मध्येच आहे. मात्र, त्यातील मतदार संख्या ३४ हजार ७६५ वरून ३३ हजार ३३ झाली आहे.
मतदार वाढलेले १५ प्रभाग
प्रभाग क्रमांक / प्रभागाचे नाव / प्रारूप यादी / अंतिम यादी
२ / जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी / ६५,०१७ / ६९,५१८
४ / दिघी, बोपखेल / ५२,४९२ / ५२,५०३
५ / रामनगर, गवळीनगर / ३९,१८७ / ४४,६९१
८ / इंद्रायणीनगर, बालाजीनगर / ४४,२४७ / ५०३५३
११ / घरकुल, अजंठानगर / ६५,७०७ / ६६,४२७
१२ / तळवडे, रुपीनगर / ४१,८०१ / ४४,६८५
१४ / मोहननगर, विठ्ठलवाडी / ५७,८१८ / ५७,९७८
१६ / रावेत, किवळे, मामुर्डी / ७२,२२३ / ७५,१०५
१९ / भाटनगर, विजयनगर / ५५,१६७ / ५६,३०७
२० / संत तुकारामनगर, वल्लभनगर / ४४,७७८ / ४५,९२१
२४ / दत्तनगर, गणेशनगर / ३९,२५१ / ४०,५९६
२५ / वाकड, ताथवडे, पुनावळे / ६४,७४० / ६६,६८६
२८ / पिंपळे सौदागर / ४७,२५६ / ५२,७९७
३१ / नवी सांगवी / ४४,६७० / ४८,६२०
३२ / जुनी सांगवी / ३९,८८० / ३९,९८१
मतदार घटलेले १७ प्रभाग
प्रभाग क्रमांक / प्रभागाचे नाव / प्रारूप यादी / अंतिम यादी
१ / पाटीलनगर, म्हेत्रेवस्ती / ७४,३४० / ६८,७६७
३ / मोशी, डुडुळगाव, चऱ्होली / ७२,४११ / ७२,१०६
६ / धावडेवस्ती, सद्गुरूनगर / ४८,६१२ / ४१,२४८
७ / भोसरी गावठाण / ४०,६९४ / ३९,८०४
९ / खराळवाडी, मासुळकर / ६३,३३० / ५८,६७८
१० / मोरवाडी, संभाजीनगर / ५४,५४० / ५२,१६७
१३ / निगडी गावठाण / ४८,६४६ / ४८,५३२
१५ / आकुर्डी गावठाण / ४७,९७१ / ४७,८९८
१७ / वाल्हेकरवाडी, बिजलीनगर / ५८,०१२ / ५६,५२३
१८ / चिंचवडगाव / ५४,९२९ / ५४,८९२
२१ / पिंपरीगाव, सुभाषनगर / ५६,२७० / ५४,९९०
२२ / काळेवाडी, कोकणेनगर / ५२,७६३ / ५२,६९९
२३ / थेरगाव, पवारनगर / ३४,७६५ / ३३,०३३
२६ / पिंपळे निलख, विशालनगर / ६८,३१७ / ६५,४८८
२७ / रहाटणी, श्रीनगर / ५३,९२६ / ५०,२९५
२९ / पिंपळे गुरव, सुदर्शननगर / ५५,३३४ / ५१,८५०
३० / कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी / ५३,३५७ / ५२,७८३
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

