ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती
पिंपरी, ता. १८ ः महापालिकेची नेहरूनगर येथे यशवंतराव चव्हाण गुलाबपुष्प वाटिका आहे. त्या आवारात सामुदायिक कंपोस्टिंग केंद्र उभारले आहे. त्यामार्फत दररोज सुमारे २५० किलोपर्यंत ओल्या कचऱ्यावर एरोबिक कंपोस्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय खतनिर्मिती केली जात आहे, अशी माहिती उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिली.
गुलाबपुष्प वाटिकेमध्ये स्वर्णलता मदरसन ट्रस्ट आणि इंडियन पॉल्यूशन कंट्रोल असोसिएशन (आयपीसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित सामुदायिक कंपोस्टिंग केंद्राला भेट दिल्यानंतर ठेंगल बोलत होते. त्यांनी शहरात विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. शहरांमध्ये वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सामुदायिक पातळीवरील कंपोस्टिंग ही प्रभावी व शाश्वत उपाययोजना आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचा अधिकाधिक अवलंब करणे आवश्यक आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. तसेच शहरातील गृहनिर्माण संस्था व शैक्षणिक संस्थांनी कचरा विलगीकरण उपक्रम प्रभावीपणे राबवून जनजागृती वाढवावी, असेही त्यांनी सांगितले.
कलासाम्राज्य आर्ट ग्रुपतर्फे कचरा व्यवस्थापनावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. आयपीसीएचे वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी अधिकारी सुजित गेडाम यांनी एरोबिक कंपोस्टिंग प्रक्रियेची माहिती दिली. कचरा विलगीकरणाचे महत्त्व उपस्थितांना सविस्तरपणे समजावून सांगितले. महापालिका प्रशासन अधिकारी सुनीता वाईकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, सुधीर वाघमारे, महेश आढाव, राजेश भाट, अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, राहुल जेठीथोर, क्षितिज रोकडे, राजेंद्र उजिनवाल, आयपीसीएचे विभागीय व्यवस्थापक झिशान खान, सोपान इंगोले, आशिष कुंभलकर, सुजित गेडाम, मनीषा वुडीपी आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

