सकाळ संवाद
चेंबरची दुरुस्ती करावी
आकुर्डी येथील चिखली रस्ता परिसरात कस्तुरी मार्केट रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून चेंबरला खड्डा पडलेला आहे. ‘सारथी’ला गेल्या आठवड्यात तक्रार केली होती. परंतु अजूनही प्रतिसाद मिळाला नाही. परिसरातील विक्रेत्यांनी या चेंबरवर एक सिमेंटचा ब्लॉक ठेवून अपघात होण्यापासून बचाव केला आहे. मी पुन्हा ‘सारथी’ वर तक्रार केली आहे. कारण ही समस्या न सोडवताच काम पूर्ण झाल्याचा संदेश ‘सारथी’कडून आला आहे.
- राहुल चव्हाण, शिवतेजनगर, चिंचवड
25V78105
फिनोलेक्स चौकात सिग्नल यंत्रणा बंद
मोरवाडी येथील फिनोलेक्स चौकातील ‘सिग्नल टाइम’ दिसत नाही. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनचालक नियमांचे पालन करत नाहीत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ही समस्या मागील अनेक दिवसांपासून आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळित होते आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो.
- विजय भालेराव, मोरवाडी
-25V78108
पदपथावरील कंटेनर हटवावे
थेरगाव येथील पदपथावर मागील अनेक दिवसांपासून लोखंडी कंटेनर ठेवलेले आहेत. येथील पुलाच्या कामावेळी या कंटेनरमधे तात्पुरते ऑफिस बनविले गेले होते. यामुळे पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करण्यात अडचण निर्माण होत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन हे कंटेनर येथून हटवावे.
- सचिन हवालदार, थेरगाव
25V78106
स्वच्छतेसाठी उपाययोजना करावी
संत तुकारामनगर येथील स्टेडियमजवळ चहा आणि नाश्त्याची दुकाने आहेत. या दुकानांमुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. ‘इंदूर’ शहरासारखी स्वच्छतेसाठीची उपाययोजना येथील प्रशासनाने घ्यायला हवी. नागरिकांमध्ये जोपर्यंत स्वछतेबद्दल जागरूकता येत नाही तो पर्यंत हे असेच चालणार आहे.
- निशिकांत गोडबोले, संत तुकारामनगर
25V78107

