निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर दक्ष रहा
पिंपरी, ता. २७ : ‘लोकशाही प्रक्रियेत मतदान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनावर नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी निवडणूक काळात केवळ मतदानाच्या दिवशी पुरते आपले कार्य मर्यादित नसून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर दक्ष राहणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात सर्व शंकांचे निरसन करून, आत्मविश्वासाने निवडणूक कामकाज पार पाडावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रारंभिक प्रशिक्षण झाले. यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त बगाडे बोलत होते. तीन सत्रात हे प्रशिक्षण पार पडले. संगणकीय सादरीकरणाद्वारे मतदान प्रक्रियेचे सविस्तर प्रशिक्षण अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले. तर द्वितीय सत्रात प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य प्रशिक्षक सतीश मेहेर, अविनाश वाळुंज, रामेश्वर पवार, नरेंद्र बंड यांच्यासह संबंधित समन्वय अधिकारी तसेच मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सहआयुक्त मनोज लोणकर म्हणाले, ‘‘मतदान केंद्रावर मतदार ओळख प्रक्रिया, गोपनीयतेची अंमलबजावणी व आचारसंहितेचे पालन याबाबत तसेच मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्यावरील उपाययोजनांची माहिती घ्यावी. मतदानानंतरची कागदपत्रे, अहवाल सादरीकरण व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय कसा ठेवण्यावर भर द्यावा.’’
उपायुक्त पंकज पाटील म्हणाले, ‘‘मतदान केंद्रावर होणारी प्रत्येक कृतीची नियमानुसार नोंदवा. कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा टाळून प्रत्येक टप्प्यावर दक्षतेने काम केल्यास व निवडणूक कायदे आणि मार्गदर्शक सूचनांची अचूक अंमलबजावणी केल्यास नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल.’’
ईव्हीएम मशिनचे प्रात्यक्षिक
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम यंत्रांची रचना, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटची कार्यपद्धती याबाबत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. आयटीआयचे जितेंद्र काथवटे, अरुण बांबळे, प्रवीण कोळेकर, योगेश गरड, किशोर शिंदे, संजीव आनंदकर, गणेश सुर्वे, शिवदास वाघमारे, जयवंत अनपट आणि अमोल शिंदे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

