कॉलेज विश्व
वारकऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिर
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे वारकऱ्यांसाठी आकुर्डी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. डॉ. जबीन पठाण आणि त्यांच्या टीमने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि औषध नियोजन केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी शिंदे आणि तिचे वडील ॲड. भाऊसाहेब शिंदे यांनी सर्व वारकऱ्यांसाठी त्यांच्या निवासस्थानी भोजनाची व्यवस्था केली होती. यावेळी भारतीय ज्ञान प्रणाली (आय.के.एस) अंतर्गत नवीन विकसित केलेले उत्पादन ‘येसूबाई नथ’ या दागिन्याचे उद्धाटन करण्यात आले. हा दागिना बनवण्यासाठी उज्वलावीरा बिडकर यांनी विद्यार्थिनींना मदत केली. राजमाता ‘‘येसूबाई’’ यांचे नाव या नथीला देण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी डॉक्टरांचे आभार मानले. नियोजन डॉ. अनिकेत गरुड, डॉ. बापुसाहेब यादव, डॉ. निकिता पारगे, डॉ. अभय शिंदे, प्रा. काजल भगत आणि डॉ. ऐश्वर्या उंचेगावकर यांनी केले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी योगसत्र उत्साहात
‘डीवायपीआयएमसीएएम’च्या वतीने समाजसेवा आणि आरोग्यवर्धन उपक्रमांतर्गत योग दिनानिमित्त आकुर्डी, पुणे येथील संत बाबा मौनीसाहेब वृद्ध आनंद आश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्फूर्तीदायक योगसत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राचे मार्गदर्शन आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक वसंत सानप यांनी केले. योग सत्रानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी ज्येष्ठ नागरिकांना ताजी फळे वितरित करून त्यांना आरोग्याची आणि काळजीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संचालिका डॉ. के. निर्मला आणि उपप्राचार्या डॉ. कविता सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
फार्मसीच्या विद्यार्थ्यांची अनाथाश्रमाला भेट
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील आधार चॅरिटेबल आश्रमाला भेट देऊन अनाथ मुलांसोबत संवाद साधला.विद्यार्थ्यांनी मुलांसाठी कपडे, डायपर्स, औषधे व इतर अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. पवन आमटी व अमिषा देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी आधार चॅरिटेबल आश्रमाची कार्यपद्धती जाणून घेतली. प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. नियोजन प्रा. मुकेश मोहिते आणि डॉ. अभय शिंदे यांनी नियोजन केले होते.
PNE25V26997
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात ‘भक्तीयोग’ उत्साहात
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय (स्वायत्त) आकुर्डी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पुनावळे येथे विठ्ठल-रखुमाई दिंडीमधील वारकरी, तसेच महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनींना योगासनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य एच. बी. सोनावणे व डॉ. मधुकर राठोड रासेयो कार्यक्रम अधिकारी, डॉ. सारिका मोहोळ, डॉ. वैभव साळवे, डॉ. पूनम वाणी, प्रा. संजय भोई, डॉ. एम. एम, बागुल, डॉ. अमोल बिवे, रजित चव्हाण, लोचन बढे यांनी केले.
PNE25V27003
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.