‘अनलॉग हिंजवडी आयटी’ साठी विधानसभेत आवाज उठवणार

‘अनलॉग हिंजवडी आयटी’ साठी विधानसभेत आवाज उठवणार

Published on

सकाळ इम्पॅक्ट

पिंपरी, ता. २८ ः हिंजवडी आयटी पार्कमधील विविध समस्यांबाबत आयटीयन्सच्या भूमिकेशी आपण पूर्णत: सहमत असून त्यांच्यासोबत आहोत. आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये या मुद्यावर राज्य सरकारचे लक्ष वेधणार आहे. एमआयडीसी, पीएमआरडीए, महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एकत्रित बैठक घेतली जाईल,’’ असे आश्वासन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिले.
वाकड-पिंपरी-चिंचवड रेसिडेन्ट डेव्हलपमेंट ॲण्ड वेल्फेअर असोसिएशनचे प्रमुख सचिन लोंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी (ता. २८) आमदार लांडगे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.
पिंपरी-चिंचवड शहराची ओळख देशभरातच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करणारे हिंजवडी आयटी पार्क सध्या अनेक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. पायाभूत सुविधांची दुरवस्था, खराब रस्ते, वाहतूक कोंडी, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधा, पाणी व सांडपाणी समस्यांमुळे येथील आयटीयन्स, स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत ‘सकाळ’ने सातत्याने आवाज उठवला आहे. त्याची दखल घेत हिंजवडी आयटी पार्कच्या समस्या सोडवण्यासाठी आणि हिंजवडीसह सात गावांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश आणि चाकण-आळंदी-खेड अशी नवी महापालिका निर्मितीबाबतच्या प्रस्तावावरही निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले.

हिंजवडी आयटी पार्कसारखा महत्वाचा आर्थिक केंद्रबिंदू मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला; तर त्याचा थेट परिणाम संपूर्ण शहराच्या विकासावर होऊ शकतो. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, स्थानिक संघटनांची भूमिका आणि राजकीय पुढाकार या सर्व घटकांमुळे # अनलॉग हिंजवडी आयटी पार्क ही मोहीम आता केवळ ऑनलाइन आंदोलन न राहता व्यवस्थेत बदल घडवून आणणारी चळवळ ठरली आहे.
- महेश लांडगे, आमदार, भाजप, भोसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com