आजची गुंतवणुक, उद्याची वाढ सुनिश्चित

आजची गुंतवणुक, उद्याची वाढ सुनिश्चित

Published on

वास्तू पुरवणी लेख (आतील पानांत)
------------------------
आजची गुंतवणूक
भविष्याची तरतूद

पिंपरी चिंचवड हे झपाट्याने वाढणारे शहर आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी आदर्श स्थान बनले आहे. रिअल इस्टेट किंवा गृहनिर्माण बाजारात गुंतवणुकीचा विचार केला तर कदाचित पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठी क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार या शहराकडे आकर्षित होत आहेत. कारण, त्यांच्या मते आजची गुंतवणूक ही भविष्यातील आर्थिक तरतूद आहे.
- आकाश फरांदे, बांधकाम व्यावसायिक

पिं परी चिंचवड शहर पुणे शहराच्या वायव्येला वसलेले औद्योगिक शहर आहे. त्याला ‘पुण्याचे जुळे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. हे शहर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत येते. या शहराच्या मध्यातून पवना नदी वाहते. उत्तरेला इंद्रायणी नदी आणि दक्षिणेला मुळा नदी आहे. हे शहर वेगाने विकसित होणारे आणि स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे एक महत्त्वाचे शहर आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, रोजगाराच्या वाढत्या संधी आणि घरांच्या परवडणाऱ्या किंमती यामुळे पिंपरी चिंचवड शहराची वेगळी ओळख निर्माण होत आहे.

सर्वसुविधांची युक्तता
गेल्या काही वर्षांत झालेला नियोजनबद्ध विकासामुळे पिंपरी चिंचवड शहर हा केवळ पुण्याचा विस्तारीत भाग राहिलेला नाही, तर ते एक स्वतंत्र आणि समृद्ध हब म्हणून उदयास येत आहे. हरित परिसर, सार्वजनिक बागा, दर्जेदार शाळा, हॉस्पिटल आणि शॉपिंग सेंटरसह हे शहर एक संतुलित आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग्य ठिकाण बनले आहे. शिक्षणाच्या दृष्टीनेही हा परिसर समृद्ध असून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा व महाविद्यालये उपलब्ध आहेत. दर्जेदार पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि दैनंदिन सेवा यामुळे लोकांची शहरात राहायला पसंती मिळत आहे.

तरुणांचा केंद्रबिंदू
हिंजवडी, भोसरी आणि चाकणसारख्या औद्योगिक वसाहतींमुळे रोजगाराच्या संधी भरभरून उपलब्ध आहेत. पीसीएमसीमध्ये सध्या मेट्रो प्रकल्प, रिंग रोड, उड्डाणपुल आणि दर्जेदार रस्‍ते अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा होत असून, रहिवाशांना आणि कामगारांना अधिक वेगवान आणि सुलभ प्रवास शक्य होतो आहे. हिंजवडी, तळवडे आयटी पार्क, भोसरी आणि चाकण औद्योगिक वसाहतींमुळे पीसीएमसी हा नोकरीसाठी येणाऱ्या तरुणांचा केंद्रबिंदू ठरतो आहे.

गुंतवणुकीसाठी संधी
पिंपरी-चिंचवडमध्ये घरात गुंतवणूक करण्यासाठी अनेक कारणे आहेत. ज्यात वेगाने होणारा विकास, नोकरीच्या संधी, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि मालमत्तांच्या किमतींमध्ये वाढ यांचा समावेश आहे. हिंजवडी, वाकड, ताथवडे, रावेत आणि किवळे यांसारख्या भागांमध्ये गुंतवणुकीची जास्त मागणी आहे. स्वस्त दरात घरांची उपलब्धता आणि किफायतशीर गृहकर्ज सध्या गृहकर्जाचे दर ७.५ ते ८.५ टक्के दरम्यान स्थिर आहेत. बांधकाम कंपन्यांनी विविध पर्याय बाजारात उपलब्ध करुन दिले आहेत. रावेत, मोशी, वाकड, तळवडे आणि चिखली या भागांमध्ये गेल्या काही महिन्यात १० ते १२ टक्क्यांपर्यंत किंमती वाढल्या आहेत. गुंतवणुकीसाठी ही स्थिर आणि वाढती बाजारस्थिती म्हणजे मोठी संधी आहे.

वास्तव्यासाठी आदर्श पर्याय
पीसीएमसी परिसर आज नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय ठरतो आहे. कारण इथे दर्जेदार रहाणीमान, उत्तम शिक्षणाच्या सुविधा आणि प्रगत पायाभूत रचना उपलब्ध आहे. मोठ्या अंतर्गत व बाह्य रस्त्यांचे जाळे, रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्प हे सगळे परिसराच्या विकासात भर घालतात. याशिवाय, अनेक मोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे आपले प्रकल्प उभारले आहेत. ज्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे दरवर्षी १० ते १२ टक्क्यांपर्यंत वाढणारी प्रॉपर्टी व्हॅल्यू, जी गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक आहे. त्यामुळेच राष्ट्रीय आणि स्थानिक बांधकाम व्यावसायिक यांना येथे सतत नवे प्रकल्प उभारण्याची प्रेरणा मिळते, आणि खरं तर, याच कारणांमुळे अधिकाधिक कुटुंबांना पीसीएमसीमध्ये स्थायिक व्हायला आवडते.

उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी
‘उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी’मुळे पिंपरी चिंचवड शहर हे केवळ घर खरेदीदारांसाठी नाही, तर उद्याच्या स्थिर आणि वाढत्या मूल्यांच्या गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. दर्जेदार पायाभुत सुविधा, उत्तम शिक्षणसुविधा आणि सतत वाढणारी प्रॉपर्टी व्हॅल्यू यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात गुंतवणूक करणे हे भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. पायाभूत सुविधांमधील सातत्यपूर्ण गुंतवणूक, वाढत्या जीवनशैलीच्या गरजा आणि परवडणारे दर यामुळे आज घर खरेदी करणे हा एक दूरदृष्टीचा निर्णय ठरेल.
(शब्दांकन ः अविनाश ढगे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com