आधुनिक युगात बारा बलुतेदार कालबाह्य

आधुनिक युगात बारा बलुतेदार कालबाह्य

Published on

दक्ष काटकर ः सकाळ वृत्तसेवा

टाकवे बुद्रूक, ता.८ : राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेती व्यवसायामधील पारंपरिकपणा लोप पावला. नवनवीन यंत्रे, ट्रॅक्टर आले. पिढीजात व्यवसाय असतानाही नवीन पिढीने उच्चशिक्षणामुळे आपले व्यवसाय बदलले. चलन व्यवस्थाही बळकट झाल्याने पूर्वीची वस्तू रुपात होणारी देवाण-घेवाण बंद झाली. त्यामुळे गावखेड्यातील बारा बलुतेदार पद्धतही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
आपले राज्य हे शेतीप्रधान आहे. पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते; ते शेतकऱ्यास व इतरांस सेवा पुरवित असत. त्यामध्ये जे शेतकऱ्याच्या नेहमीच्या गरजा भागवत त्यांना बलुतेदार असे म्हणत. हेच गावगाड्याचे शिल्पकार होते. पिढ्या न् ‌पिढ्या तेच ठरावीक काम करत. त्यांच्यामार्फत दैनंदिन व्यवहार होत असे. आता मात्र पूर्वीसारखे राहिले नाही. बारा बलुतेदारांची जातीनुसार काम करणारी युवा पिढी आता नवयुगात शिक्षण, यंत्र, उद्योग व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञानामुळे इतर व्यवसाय व नोकरी करू लागली आहे. त्यामुळे वस्तूंची देवाण घेवाण बंद होऊन बारा बलुतेदारी पद्धत बंद होणाच्या मार्गावर आहे.

हे होते बारा बलुतेदार...
- कुंभार ः मातीची भांडी बनवत.
- कोळी ः मासेमारी हा मुख्य व्यवसाय.
- गुरव ः मंदिरात देवांची पूजाअर्चा
- चांभार ः जनावरांच्या कातडीपासून चामडी वस्तू बनविण्याचे काम
- मातंग ः दोरखंड, झाडू, तोरणे बनवत
- तेली ः तेलबियाणांपासून तेल काढण्याचे काम
- न्हावी ः केशकर्तन, दाढी करण्याचे काम
- परीट ः घरोघरचे कपडे जमा करून धुवण्याचे काम
- महार ः गावचे संरक्षण व इतर कामे
- लोहार ः ऐरणीवर लोखंडापासून निरनिराळ्या वस्तू बनविणे
- सुतार ः लाकडापासून वस्तू बनविणे
- जोशी ः धार्मिक विधी करण्याचे काम


पूर्वी गावे वसवताना प्रत्येक गावात बारा बलुतेदारांची घरे वसविण्याची जबाबदारी शेटे आणि महाजन कुटुंबाकडे असायची. त्यानुसार गावाच्या रचना व्हायची. प्रत्येकाचे कामकाज ठरले जायचे. कामाच्या मोबदल्यात वस्तू तसेच धान्यांची देवाण घेवाण होत असे. ब्रिटीश काळात त्या पद्धतीमध्ये बदल झाला. आता जरी ही पद्धत अस्तित्वात नसली तरी काही लोक अजूनही मान समजून शेतीमधून पीक तयार होते. तेव्हा, आपले धान्य घ्यायला येताना दिसतात. शेतकरी राजा अजूनही त्यांना असा हिस्सा देताना दिसून येतो. अलीकडच्या काळात लोक त्यांच्या जातीनुसार नाही; तर अधिक नफा मिळेल त्याठिकाणी काम करू लागलेत. नोकरी- व्यवसाय करू लागले आहेत.
- सचिन शेडगे, इतिहास अभ्यासक
PNE25V29710, PNE25V29667

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com