प्लॅस्टिक बंदीच्या कारवाईत बनवाबनवी
पिंपरी, ता. २५ ः राज्यात एकल वापराच्या (सिंगल युज) प्लॅस्टिक बंदीबाबत शासनाकडून तपासणीसाठी वेळोवेळी अधिसूचना काढते. परंतु महापालिका क्षेत्रात अनेक भागांत गेल्या काही वर्षांत प्लॅस्टिक बंदी मोहीमच राबविण्यात आलेली नाही. चालू आर्थिक वर्षात १७५९ पैकी ३९२ आस्थापनांवर कारवाई झाली, पण दंडाबाबतच्या माहितीत बनवाबनवी दिसते आहे.
पालिकेचे मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालये, आरोग्य मुख्यालयाच्या परिसरातील बहुतेक चौकांतून कॅरी बॅगची सर्रास विक्री होते. यंदा चार महिन्यांत २३२०० आस्थापनांमध्ये तपासणी झाली. त्यात १७५९ आस्थापनांमध्ये बंदी असलेले एकूण ७६२.७९ किलो ग्रॅम प्लॅस्टिक मिळाले. यापैकी ३९२ आस्थापनांवर १९ लाख २३ हजार १०० रुपये दंडात्मक कारवाई झाली. प्रत्यक्षात प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे १९ लाख ६० हजार रुपये दंड वसूल होणे आवश्यक आहे. मुळात आरोग्य विभागाने एक हजार ३६७ आस्थापनांवर कारवाईच केली नाही. त्यामुळे ६८ लाख २५ हजार रुपयांचा महसूल बुडाला.
अशी आहे शिक्षेची तरतूद
कचरा व्यवस्थापन नियम २०२१ नुसार एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिक वस्तूंवर बंदी आहे. नियम मोडल्यास पहिल्या वेळी पाच हजार, दुसऱ्या वेळी दहा हजार, तर तिसऱ्या वेळी २५ हजार रुपये दंड ठोठावला जातो. याशिवाय तीन महिने कारावासाची शिक्षा आहेत.
नियमानुसार कारवाई का नाही?
नियमानुसार दंडात्मक कारवाई आवश्यक असताना मनमानी पद्धतीने वसुली होत आहे. काही आस्थापनांमध्ये दोन ते तीन वेळा बंदी असलेले प्लॅस्टिक आढळले. यानंतरही केवळ पाच हजार रुपये दंड करण्यात आला. हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे अज्ञान आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकाच दिवशी एका रुग्णालयाला १५००० रुपये दंड करण्यात आला.
---
महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आणि सभागृहात प्लॅस्टिक वापराबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर ‘लाडकी बहिण’ योजनेचे अर्ज बंदी असलेले प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवण्यात आले होते. प्लॅस्टिकची बंदी केवळ कागदावर अस्तित्वात आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी दंडाच्या वसुलीतील तफावतीबाबत चौकशी केली पाहिजे.
- बी. एस. पाटील, नागरिक, संभाजीनगर
-----
नागरिकांच्या तक्रारीवरून विविध आस्थापनांकडून दंडात्मक वसुली केली आहे. दंडात्मक रकमेचा भरणा पालिकेच्या तिजोरीत केला जातो. पुन्हा प्लॅस्टिक तपासणी करण्यासाठी पथके नेमली जाणार आहेत.
- गणेश देशपांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी, महापालिका
-----
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.