विविध पदांची निवडणूक जगद्‍गुरु स्कूलमध्ये उत्साहात

विविध पदांची निवडणूक जगद्‍गुरु स्कूलमध्ये उत्साहात

Published on

पिंपरी, ता.२६ ः लोकशाहीमधील निवडणूक प्रक्रिया मुलांना समजावी यासाठी देहूगाव येथील साकोरे शिक्षण संस्थेद्वारा संचलित जगद्‍गुरु इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी हेडबॉय, हेडगर्ल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा विविध २२ पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीसाठी मुख्यनिवडणूक अधिकारी म्हणून सुहास धाईंजे यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक ६ वॉर्डमध्ये विभागण्यात आली. त्यानुसार प्रत्येक वॉर्डमधून जास्त मतदान घेतलेल्या ४ उमेदवार विजयी घोषित करण्याचे ठरविण्यात आले, असे एकूण २० उमेदवार घोषित करण्यात आले.
हात वर करून विद्यार्थी हेडबॉय, हेडगर्ल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदासाठी २२ विजयी उमेदवारांसाठी मतदान घेण्यात आले. त्यामधून हेडबॉय म्हणून सौजन्य खांडेकर, हेडगर्ल म्हणून अक्षता गायकवाड तर मुख्यमंत्री म्हणून यश पवार तर उपमुख्यमंत्री म्हणून विनायक बोडखे याची निवड झाली. या निवडून आलेल्या सर्व विजयी व नव्याने स्थापन झालेल्या शालेय मंत्रिमंडळला संस्थेचे अध्यक्ष संतोष साकोरे, सचिव दीपाली साकोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गाडेकर, पर्यवेक्षक हिना मुजावर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
PNE25V34672

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com