घोषवाक्य स्पर्धेत सहभागासाठी चारच दिवस बाकी
पिंपरी, ता. २७ : केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा, तर राज्यात पहिला क्रमांक पटकाविला. आता महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ ची तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने स्वच्छताविषयक घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली आहे.
या स्पर्धेत ३१ जुलैपर्यंत सहभागी होता येईल. अधिकाधिक जास्त नागरिकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
स्वच्छता सर्वेक्षण २०२५-२६ च्या स्पर्धेत देशात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगानेच शहरातील घोषवाक्य स्पर्धा ‘स्वच्छ भारत अभियान’ तसेच ‘स्वच्छ सर्वेक्षण’ या राष्ट्रीय उपक्रमांचा एक भाग आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. सहभागी होणाऱ्यांनी स्वच्छता, आरोग्य, जबाबदारी, नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी संकल्पनांवर आधारित आकर्षक, प्रभावी व प्रेरणादायी घोषवाक्ये तयार करायची आहेत.
-----
स्पर्धेचा तपशील
- पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली
- एक व्यक्ती कमाल दोन घोषवाक्ये पाठवू शकते
- घोषवाक्ये मराठीत असावीत
- एक घोषवाक्य १० शब्दांच्या आत असावे
- सर्वोत्कृष्ट घोषवाक्यांची निवड करून त्यांना महापालिकेच्या विविध माध्यमांतून प्रसिद्धी करणार
- पहिल्या तीन क्रमांकांसाठी आकर्षक पारितोषिके
- विजेत्यांना आकर्षक बक्षिसे
- घोषवाक्य पाठविण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै
-------
असे व्हा सहभागी
- https://forms.gle/४XiCM२jLxL९A१LZGA या संकेतस्थळावर जा
- त्यावरील एक अर्ज उघडा
- अर्जात नाव, ई-मेल, मोबाईल क्रमांक, पत्ता ही माहिती भरा
- रकान्यांमध्ये घोषवाक्य लिहा
- त्यानंतर अर्ज सबमिट करा
-----
पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने स्वच्छताविषयक घोषवाक्य स्पर्धा घेतली आहे. नागरिकांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती वाढावी, तसेच स्वच्छताविषयक उपक्रमात जनसहभाग वाढवा, हे यामागील उद्देश आहेत. शहरातील अधिकाधिक नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग व्हावे.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.