संवाद माझा

संवाद माझा

Published on

संवाद माझा
गवळीनगरच्या समस्यांवर
पालिकेची थातूरमातूर आश्वासने
दिघीतील गवळीनगर परिसरात बहुतेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वाहनचालकांनी कसरत करावी लागते. पादचाऱ्यांनाही त्रास होतो. येथे चर्च व जैन मंदिर आहे. गवळीनगर रस्ता क्रमांक दोन आणि तीनचे काँक्रिटीकरण झाले आहे. येथील पाणीही दूषित आहे. त्यामुळे गटाराचे काम करण्यात आले, पण डांबरीकरण झाले नाही. या समस्यांबद्दल ‘सारथी’ वर आतापर्यंत सहा वेळा तक्रार दाखल केली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फक्त फोन केला आणि आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात काहीही कृती केलेली नाही. याच सदरातून मी तक्रार करून तीन वर्षे उलटली आहेत. प्रत्येक वेळी थातुरमातूर कारण दिले जाते. पावसाळ्यापूर्वी अर्ध्याच रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. हा रस्ता दिघी मार्गासाठी पर्याय आहे. त्यामुळे खड्डे तातडीने बुजविण्याची गरज आहे.
- धर्मा पाटील, गवळीनगर, दिघी
-25V35135
----
जुनी सांगवीत कचऱ्याचे ढीग

जुनी सांगवीतील शितोळे प्राथमिक विद्यालयाजवळ कचऱ्याचा ढीग लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर दुर्गंधीही पसरली आहे. बालाजी लॉन्स, ढोरे नगर शेजारच्या रस्त्यावरही कचऱ्याचे ढीग लागले आहेत. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- मनोज पवार, पवारनगर, जुनी सांगवी
PNE25V35132
---
झाडाची फांदी हटवा
मोरवाडीतील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवनाजवळील श्रद्धा हेरिटेज ए2 इमारतीसमोरील रस्त्यावर झाडाची एक फांदी पावसामुळे कोसळली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वाहतुकीत अडथळा येत आहे. ही फांदी त्वरित हटवावी व लोकांची गैरसोय टाळावी. हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे कायम वर्दळ असते आणि कोंडी होते. सध्या रस्ता एकाच बाजूने सुरू असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. त्यामुळे महापालिकेने ही फांदी तातडीने हटवावी.
- अरविंद देशपांडे, मोरवाडी
: PNE25V35136
---
ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजच्या चौकात खूप खड्डे झालेत. या चौकात मोठी शैक्षणिक संस्था असल्याने सकाळी ८ ते १० या वेळेत बरीच वाहतूक असते. स्कूल बसना वळण घ्यावे लागते. त्यावेळी चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे महापालिकेने खड्डे त्वरित बुजवावेत.
- यशश्री कोकणे, ताथवडे
E25V35156
---
ताजणे मळा परिसरात पथदिवे लावा
प्रेम मन्नत गृहनिर्माण संस्थेच्या परिसरातील पदपथांवर पुरेसे विद्युत दिवे नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरात अंधार असतो. त्यामुळे अपघात, चोरी, गैरकृत्यांचा धोका वाढला आहे. या भागात अनेक नागरिक, महिला व लहान मुले ये-जा करीत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यावर पुरेशी प्रकाशव्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या परिसरात योग्य ठिकाणी दिवे लवकरात लवकर लावण्याची कार्यवाही व्हावी.
- निर्गुण थोरे, चऱ्होली
NE25V35133
---
वर्दळीच्या चौकातच चक्क भंगार गोदाम
चिंचवड ते जकात नाक्याकडून बिर्लामार्गे येताना चौकातच भंगार गोदाम झाले आहे. त्यामुळे असंख्य अडचणी येत आहेत. वास्तविक तेथे पदपथाची नितांत गरज आहे. येथे कोंडी होत असल्याने अनेकदा दुचाकींना रिक्षा घासून जातात. अनेक मोठ्या गाड्या रस्त्यावरच थांबविल्या जातात. त्यामुळे येथील नागरिकांना खूपच त्रास होतो. पालिकेने लवकरच प्रतिबंधात्मक ती उपाययोजना करावी. मुख्य म्हणजे पदपथाची सोय करावी.
- रमेश पाटील, चिंचवड
PNE25V35131

---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com