पुनर्वसन प्रकल्पाबाबत म्हाडाने मागविल्या हरकती

पुनर्वसन प्रकल्पाबाबत म्हाडाने मागविल्या हरकती

Published on

पिंपरी, ता. २८ ः संत तुकारामनगर येथील पुनर्विकास प्रकल्पाबाबत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) विकसक निवडण्याची निविदा पूर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.
सुमारे नऊ एकर भूखंडावर १९८५ मध्ये ९४१ घरे बांधण्यात आली. या दुमजली इमारती असून २८० चौरस फूट क्षेत्रफळाची घरे आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार म्हाडाने पुनर्बांधणीचे नियोजन केले आहे. आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न गट (एलआयजी) आणि मध्यम उत्पन्न गटातील (एमआयजी) लाभार्थ्यांना घरे देण्यात आली. त्यावेळी ‘एलआयजी’ गटासाठीच्या घरांची किंमत २७ हजार, तर ‘एमआयजी’ गटासाठीच्या घरांची किंमत ३७ हजार रुपये होती. आता घरे जुनी झाली आहेत.
‘एलआयजी’ गटासाठी ९००, तर ‘एमआयजी’ गटासाठी १२०० चौरस फूट सदनिकेची मागणी आहे. त्यानुसार प्रकल्प कसा असणार, त्यामध्ये सुविधा काय असणार, किती चटई क्षेत्रफळाची घरे असणार आदींचा अंतर्भाव प्रकल्प आराखड्यात आहे. आता विकसकाची निवड होणार आहे. नागरिकांना सूचना व हरकती नोंदविण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प आराखड्यात समावेश करून अंतिम निविदेचे जाहीर प्रकटन करण्यात येईल.
-------
सदस्यांनी घेतली निविदेची माहिती
संत तुकाराम नगर गृहनिर्माण सहकारी गृहरचना संस्थेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या उपस्थितीत ९४१ सदस्यांसमोर प्रकल्प आराखडा सादर करण्यात आला. तज्ज्ञ व्यक्तींनी निविदा प्रक्रिया आणि प्रकल्प आराखड्याची माहिती सदस्यांना समजावून सांगितली. प्रकल्पातील सोयी-सुविधांची चित्रफीत दाखवण्यात आली. सर्व सभासदांनी निविदा प्रक्रिया आणि प्रकल्प आराखड्याला बहुमताने सहमती दर्शविल्याची माहिती भोसले यांनी दिली.
------
नागरिकांची मागणी
- प्रकल्पाचा भूखंड ः सुमारे नऊ एकर
- घरांची मागणी ः प्रत्येकी ९०० ते १२०० चौरस फुट
- घरासोबत ः कार पार्किंग, इतर सोयी-सुविधा
- दुकानांबाबत ः ज्यांची दुकाने त्यांना ती द्यावीत
- घरांबाबत ः घरे नावावर करून ताबा द्यावा
-----
संत तुकाराम नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेशी अभिहस्तांतरण पत्र (कन्व्हेयन्स डीड) अद्याप झालेले नाही. मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) आणि नोंदणी शुल्क जमा झाले आहे की नाही, हे तपासावे लागले. ‘कन्व्हेयन्स डीड’ झाल्यानंतर जो कुणी विकसक येईल त्याच्यासमवेत करार करण्यात येईल.
- राहुल साकोरे, मुख्य अधिकारी, पुणे मंडळ, म्हाडा
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com