मेट्रोची सोय, वाहनतळाची गैरसोय
पिंपरी. ता. २८ : पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो सेवा सुरु होऊन अनेक महिने उलटले तरी मेट्रो स्थानकाजवळील वाहनतळाच्या सुविधेचा प्रश्न कायम असून तो गंभीर झाला आहे. प्रामुख्याने मोरवाडी परिसरात वाहनतळाच्या व्यवस्थेतील विसंगतीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
पुण्याकडून निगडीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोरवाडीत वाहनतळाची पार्किंगची सोय करण्यात आली आहे, मात्र निगडीकडून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोणतीही सोय नाही.
वाढती लोकसंख्या, वाढती वाहतूक
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या तीस लाखांपेक्षा जास्त आहे. येथे मेट्रोने दररोज सुमारे हजारो प्रवासी प्रवास करता. ते खासगी वाहन किंवा पीएमपी बसने मेट्रो स्थानक गाठतात. सुविधेअभावी त्यांना वाहन रस्त्यावरच उभे करणे भाग पडत असल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन अपघातांची शक्यता वाढली आहे.
शहरात मेट्रोची पीसीएमसी स्टेशन, संत तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी अशी स्थानके आहेत. या सर्व स्थानकांबाहेर वाहनतळाची अधिकृत सुविधा नसल्यामुळे खालील समस्या निर्माण झाल्या आहेत.
सर्वच स्थानकांबाहेर गंभीर स्थिती
- पदपथांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
- रस्त्यावरील वाहतुकीत अडथळा
- वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले
- वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा धोका
- अपघातांचा वाढता धोका
---
वाहतूक पोलिसांची कारवाई
वाहतूक पोलिसांनी अनेक वेळा अनधिकृत पार्किंगवर कारवाई केली. नागरिकांची वाहने उचलून त्यांना दंड ठोठावला जात आहे. त्यामुळे नागरिक अजूनच त्रस्त झाले आहेत. अनेक प्रवासी अपुऱ्या माहितीमुळे वाहन चुकीच्या ठिकाणी लावतात आणि त्यांना दंड भरावा लागतो.
---
महत्त्वाच्या सुविधेकडे दुर्लक्ष
वाहनतळाच्या सुविधेबाबत महापालिका आणि मेट्रो प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्यात, परंतु कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. सार्वजनिक वाहतुकीला चालना देणाऱ्या मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांमध्ये वाहनतळ ही महत्त्वाची बाब आहे. त्याकडेच सतत दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
---
त्वरित उपाययोजनेची मागणी
मेट्रो स्थानक परिसरात सुस्थितीत आणि पुरेशा प्रमाणात वाहनतळ सुविधा निर्माण करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे.
- सर्व मेट्रो स्थानकांच्या परिसरात बहुमजली वाहनतळ उभारावे
- तात्पुरत्या स्वरूपात खुल्या मैदानावर वाहने लावण्याची सोय करावी
- वाहनांची चोरी थांबवण्यासाठी सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक नेमावेत
- पीएमपी, रिक्षा आणि सायकली लावण्यासाठी वेगळी व्यवस्था असावी
- नागरिकांना योग्य माहिती देणारे फलक आणि डिजिटल यंत्रणा बसवावी
---
सोयीऐवजी त्रासच वाढला
मेट्रो सुविधा नागरिकांसाठी मोठा दिलासा असताना वाहनतळाचा प्रश्न डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे मेट्रोचा वापर न करण्याचा विचार अनेक नागरिक करीत आहेत. अशा वेळी मेट्रोला चालना देण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी वाहनतळ व्यवस्था अत्यावश्यक बाब आहे. प्रशासनाने लवकरात लवकर समस्येचे गांभीर्य ओळखून तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
...............
मोरवाडी चौकात निगडीकडे जाणाऱ्या मार्गात पीसीएमसी मेट्रो स्थानकात वाहनतळाची सुविधा सुरू केली आहे. याच्या पलीकडील
बाजूलाही वाहनतळाची सोय करण्यात येईल. तेथे जागा अपुरी असल्याने पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेथे सुद्धा काही दिवसांत वाहनतळ सुविधा उपलब्ध होईल.
- बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.