गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

मेफेड्रोन बाळगणाऱ्याला अटक
पिंपरी : मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी तरुणाला गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पाषाण-सुस रस्त्यावर करण्‍यात आली. राकेश झुबामराम चौधरी (वय २६, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. राकेशकडे मेफेड्रोन असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ९१ हजार ७०० रुपये किमतीचे १९.१७ ग्रॅम मेफेड्रॉन, मोबाइल, वजन काटा असा दोन लाख एक हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यावर गुन्‍हा
पिंपरी : मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत आरडाओरडा केला. तसेच पोलिस उपनिरीक्षकासह इतरही पोलिसांना शिविगाळ आणि धक्काबुक्की केली. ही घटना भोसरीतील पीएमटी चौकात घडली. विनय नवनाथ चौधरी (वय २९, रा. देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शिवकुमार वैजनाथ दगडगावे यांनी भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

हत्यार बाळगल्याप्रकरणी युवकाला अटक
पिंपरी : कुकरी नावाचे हत्यार बाळगल्याप्रकरणी युवकाला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरी येथे करण्यात आली. नावेद खमर कुरेशी (वय २२, रा. कामेश रेसिडन्‍सी, खराळवाडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी नावेद याच्‍याकडे शस्‍त्र असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी त्‍याला हिंदुस्तान अँटिबायोटिक कंपनीच्या मैदानातून ताब्‍यात घेतले.

दुचाकी घसरून चालकाचा मृत्‍यू
पिंपरी : भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्‍या अपघातात चालकाचा मृत्‍यू झाला. ही घटना बावधन-भुगाव रस्त्यावर घडली. रिद्धेश नीलेश जाधव (वय १९, रा. कोथरूड, पुणे, मूळ धुळे) असे मृत्‍यू झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

मद्य विक्रीप्रकरणी निगडीत कारवाई
पिंपरी : मद्य विक्रीसाठी आलेल्या युवकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले. निगडीतील मिलिंदनगर येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात किरण चंद्रकांत कुलाले (वय २८, रा. ओटास्कीम, निगडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलाले याच्याकडे सात हजार ३०० रुपयांचा मद्यसाठा आढळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com