रोटरी डायनॅमिक भोसरीचे पदग्रहण उत्साहात
पिंपरी, ता. २९ ः रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या २०२५-२६ कार्यकालासाठीच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मोशी येथे उत्साहात झाला.
अध्यक्ष डॉ. संतोष मोरे, तर सचिवपदी डॉ. योगेश गाडेकर यांची निवड झाली. प्रांतपाल संतोष मराठे, सहायय्क प्रांतपाल अशोक शिंदे, संतोष मराठे, क्लबचे संस्थापक डॉ. अशोककुमार पगारिया, माजी अध्यक्ष रामदास जैद, ज्ञानेश्वर विधाते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह मावळते अध्यक्ष दीपक सोनवणे, कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले.
मिलिंद बावा, केशव काळदाते यांनी सूत्रसंचालन केले. सचिव डॉ. योगेश गाडेकर यांनी आभार मानले.
नवी कार्यकारिणी ः डॉ. संतोष मोरे (अध्यक्ष), डॉ. योगेश गाडेकर (सचिव), दीपक सोनवणे (तत्काळ माजी अध्यक्ष), सुनील पाटील पाटे (कोषाध्यक्ष), डॉ. अशोककुमार पगारिया (संस्थापक ), रामदास जैद (कौन्सिलर), ज्ञानेश्वर विधाते (फाउंडेशन), केशव काळदाते (सेवा प्रकल्प), दत्तात्रय कोल्हे (वैद्यकीय सेवा प्रकल्प), अण्णासाहेब मटाले (पर्यावरण), पांडुरंग वाळुंज (शिक्षण), विजय गोरडे (ट्रेनर), बाळासाहेब कोते (फेलोशिप), डॉ. अमित त्रिपाठी (अॅडमिन), ज्योतिराम भोसले (मेंबरशिप), स्वप्नील भालेराव (व्होकेशनल), रोहित भांबुर्डेकर (युवक), संचालक मंडळ ः गणेश काशीद, विठ्ठल नवाने, पंकज महाले, विजय रासकर, अविनाश तळोले, प्रसाद भांबुर्डेकर, डॉ. कृष्णा दळवी, नियाज शेख, गुलमोहमद, संतोष मुऱ्हे, संतोष हिंगे, संजय पाटील.
---
विविध पुरस्कार प्रदान
यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण झाले. याचे मानकरी असे ः विजय गोरडे ः अध्यक्षीय, ज्ञानेश्वर विधाते-सुनीता विधाते ः ‘बेस्ट रोटरी कपल’, दत्तात्रय कोल्हे ः बेस्ट सर्व्हिस प्रोजेक्ट’, अण्णासाहेब मटाले ः ‘बेस्ट क्लब प्रेझेन्स’, अमितकुमार त्रिपाठी ः रोटरी सेवा समर्पण, डॉ. गजानन मंकीकर ः ‘रोटरी एक्सलन्स’, दीपा दांगट ः ‘स्टार ऑनररी लेडी मेंबर’ रांगोळीकार पूजा काळे ः कलासाधना.
-----