क्राइम विषयक बातम्या
गुन्हे वृत्त
..........
बँक अधिकाऱ्यांकडून ४३ लाखांची फसवणूक
पिंपरी ः अशोक नागरी सहकारी बँकेचे अधिकारी आणि एका व्यक्तीने मिळून एकाची ४३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना संत तुकारामनगर, पिंपरी येथे २०२२ ते २८ एप्रिल २०२२ या कालावधीत संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली. या प्रकरणात पवन सदाशिव मिसाळ (वय ५३, धानोरी, पुणे) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक नागरी सहकारी बँकेचे सहायक व्यवस्थापक जग्गुजी तनवाणी (४४), खजिनदार प्रकाश कुंभार (४५) आणि श्याम सिंग (४०, वल्लभनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक नागरी सहकारी बँकेचे सहायक व्यवस्थापक जग्गुजी तनवाणी, खजिनदार प्रकाश कुंभार आणि फिर्यादीचा मित्र श्याम सिंग यांनी फिर्यादीला कर्ज मिळवून देतो असे सांगितले. त्यांनी फिर्यादीच्या धानोरी येथील सहा गुंठे प्लॉटपैकी तीन गुंठे प्लॉट गहाण ठेवणे अपेक्षित असताना फिर्यादीची दिशाभूल करून संपूर्ण सहा गुंठे प्लॉट गहाणखत करून घेतले. कुंभार याने फिर्यादीकडून प्रोसेसिंग फी, सभासद फी आणि मूल्यांकन फीच्या नावाखाली फिर्यादीचे तीन चेक घेतले. या चेकचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून आरोपी श्याम सिंग याच्या नावे सेल्फ म्हणून आणि महाराष्ट्र एंटरप्राइजेस यांच्या नावे टाकून फिर्यादीची ४३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. संत तुकारामनगर पोलिस तपास करत आहेत.
सुरक्षारक्षकास किरकोळ कारणावरून मारहाण
सुरक्षा रक्षकाला गाडी रस्त्यातून बाजूला करण्याच्या वादातून मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी सायंकाळी मुळशी तालुक्यातील द वन सोसायटी गेट समोर, मातोळवाडी, भुगाव येथे घडली. या प्रकरणात दिलीप कुसाबा खानेकर (६९) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिजित अंकुश शेडगे (३५, भूगाव, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करत असताना आरोपीने गाडी रस्त्यातून बाजूला करण्याच्या वादातून त्यांना शिवीगाळ केली. आरोपीने त्याच्या गाडीतील लाकडी काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. बावधन पोलिस तपास करत आहेत.
दुचाकी चोरी करणाऱ्यास अटक
दुचाकी चोरीप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराजवळ घडली. अक्षय बापू सागर (वय २६, पिंपळे सौदागर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात लक्ष्मीकांत राजेश रत्नपारखी (वय २९, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची ४५ हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची दुचाकी आरोपी अक्षय याने चोरून नेली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही वेळेत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. सांगवी पोलिस तपास करत आहेत.
अवैध दारू वाहतूकप्रकरणी एकास अटक
चिखली पोलिस स्टेशनच्या हद्दीत चिखली रोड, मोई फाटा येथे अवैध दारूची वाहतूक करताना एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली. प्रशांत भारत जगताप (वय २३, मोईगाव, खेड, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस हवालदार रोहित संसारे यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत जगताप त्याच्या ताब्यातील ७० हजार रुपये किमतीच्या दुचाकीवरून १२ हजार २४० रुपयांची देशी-विदेशी दारू बेकायदेशीरपणे वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी ८२ हजार २४० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू आणि वाहन जप्त केले आहे. चिखली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गांजा विक्रीप्रकरणी एकाला अटक
शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उर्से गावातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ गांजाची अवैध विक्री करताना एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. इसाक गणीभाई शेख (वय ५२, उर्से, मावळ) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह सोनू ऊर्फ सागर (भाटनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार गोविंद डोके यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद
दिली आहे.
-----------------------------
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक
एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी प्राधिकरण येथे एका तरुणाला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई मंगळवार आणि बुधवारच्या रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सूरज राजू गिराम ऊर्फ डोंगरे (वय २०, मेदनकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार हर्षद कदम यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अभियंत्याची ४६ लाखांची फसवणूक
व्हॉट्सअॅपवरून ऑनलाइन पद्धतीने गुंतवणुकीच्या नावाखाली एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची ४६ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना एक ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली. अप्पासाहेब कोष्टी (वय ५४, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अन्या स्मिथ आणि अन्य व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपचा ग्रुप अॅडमीन विक्रम नादार याने फिर्यादीला ‘एज्क अॅप’ मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती देऊन ग्रुपमधील लोकांना गुंतवणुकीवर खूप जास्त परतावा मिळत असल्याचे ग्रुपवर स्क्रीनशॉट टाकून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यामुळे फिर्यादीने ३१ लाख ८० हजार रुपये इतकी रक्कम गुंतवली. तसेच अन्य एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ग्रुप अॅडमीन आदित्य शर्मा/आदित्य अगरवाल यांनी एका कंपनीचे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती देऊन ग्रुपमधील लोकांना गुंतवणुकीवर खूप जास्त परतावा मिळत असल्याचे ग्रुपवर स्क्रीनशॉट टाकून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीला १७ लाख ८० हजार रुपये रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. ४६ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलिस तपास करत आहेत.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.