पिंपरी-चिंचवड
नरहरी प्रतिष्ठानला व्हीलचेअर भेट
काळेवाडी, ता.३१ : पिंपरी चिंचवड शहर नरहरी प्रतिष्ठान या सुवर्णकार संस्थेस रहाटणी येथील राजेंद्र शंकर खोल्लम यांच्यातर्फे व्हील चेअर भेट देण्यात आली. समाजातील गरजू व्यक्तीस विनामूल्य ती उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेस देण्यात आली. अनेकवेळा समाजातील ज्येष्ठ व पायाने चालणे शक्य नसणाऱ्या व आजारी व्यक्तीस घरी किंवा इतर ठिकाणी व्हीलचेअर उपलब्ध होत नाही. अशावेळी नरहरी प्रतिष्ठानकडून ही व्हील चेअर उपलब्ध करुन देण्यात येईल, असे अध्यक्ष दिलीप फाकटकर यांनी सांगितले. संस्थेच्यावतीने राजेंद्र खोल्लम यांचे आभार मानण्यात आले.
PNE25V35973