शाहू अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा आज गौरव समारंभ ता. २ शाहू अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ
पिंपरी, ता. १ ः ताथवडे येथील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या २४-२५ मध्ये बी.टेक, एम.टेक, एम.सी.ए.एम.बी.ए. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा सोहळा २ ऑगस्ट रोजी आकुर्डीतील ग. दि. माडगुळकर सभागृहात दुपारी पावणेचार वाजता होणार आहे, अशी माहिती राजर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस. पी. भोसले यांनी केले आहे. हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. टी. जे. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व आय. आय. टी. रोपारचे संचालक डॉ. राजीव अहुजा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमामध्ये साधारण ११८७ विद्यार्थ्यांना मानांकन आणि प्रशंसा पत्र देण्यात येणार आहे. परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस म्हणून एक लाख रुपये रोख आणि सुवर्ण पदक, आणि सर्वोत्तम विद्यार्थ्यास देखील बक्षीस म्हणून एक लाख रुपये रोख आणि सुवर्ण पदक देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजकुंवर डुबल आणि विद्यार्थी परीक्षा संचालक डॉ. बी. डी. जाधव यांनी दिली आहे.