पिंपरी ते निगडी मेट्रोच्या कामास वेग

पिंपरी ते निगडी मेट्रोच्या कामास वेग

Published on

पिंपरी, ता. २ : पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते भक्ती-शक्ती चौक या विस्तारित मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. निगडी येथील लोकमान्य टिळक चौकात पिलरच्या कामास सुरूवात झाली आहे. त्यासाठी बॅरिकेट्स टाकण्यात आले आहेत. कामाला सुरूवात झाली असून, शहरवासीयांच्या सेवेत लकरच हा टप्पा दाखल होणार आहे.
पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब भू तपासणीनंतर गेल्या वर्षी सहा जुलै रोजी बांधण्यास सुरूवात झाली होती. अण्णाभाऊ साठे पीएमपीएमएल आगार, भक्ती-शक्ती या ठिकाणी पहिला खांब टाकण्यात आला होता. या पूर्ण टप्प्यास एकूण ३६ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे मत महामेट्रो प्रशासनाने मांडले होते. कामाची गती पाहता तारखेपूर्वीच भक्ती-शक्ती मार्गाचे पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे. या मार्गात पिलर आणि सेंगमेंट बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. नुकतेच फोर्स मोटर ते खंडोबा माळ चौकात सेंगमेंट बसविण्यात आले आहे. पीसीएमसी स्थानकापासून चिंचवड, आकुर्डी, निगडी व भक्ती-शक्ती चौक असे नवीन मेट्रो स्थानक होणार आहे. या मार्गाचा विस्तार पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांसाठी एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे, ज्यामुळे पुण्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागांशी मेट्रो मार्गाने जोडता येणार आहे.
औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल आयटी आणि सांस्कृतिक नगरीच्या दिशेने झपाट्याने सुरू आहे. तसेच रोजीरोटी आणि शिक्षणासाठी शहरात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शहराने तीस लाख लोकसंख्येचा टप्पा पार केला आहे. याभागात असलेल्या मोठमोठ्या कंपन्या, डिफेन्सचा परिसर, शासकीय कार्यालय, वायसीएम रूग्णालय, महाविद्यालयांमुळे पिंपरी ते निगडी मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होताना दिसून येते. यामुळे सतत वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. तसेच शहर प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर मात होऊन शहरातील मेट्रो प्रकल्प हा शहरवासीयांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

मार्गाचा विस्तार : एकूण तीन वर्षाचा कालावधी
- निगडी ते पिंपरी या मेट्रो मार्गातील पहिल्या खांबांचे बांधकाम सहा जुलै २०२४ पासून सुरू झाले
- सहा जुलै २०२७ रोजी कामास लागणारा कालावधी
- पिंपरी-चिंचवड (पीसीएमसी) ते निगडी मेट्रोचा विस्तार पुणे मेट्रोच्या लाइन १ ए चा भाग आहे

नवीन स्थानके
या मेट्रो मार्गाला चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती चौक येथे नवीन स्थानके जोडली जातील, ज्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवासाला जोडणी सुलभ होईल.

१. चिंचवड स्थानक
या परिसराजवळ औद्योगिक परिसर असून, काही अंतरावर ऐतिहासिक ठिकाणे आहेत. दाट लोकवस्ती आणि चिंचवड रेल्वे स्थानक असल्याने रेल्वे प्रवासी आणि स्थानिकांना याला लाभ होईल.

२. आकुर्डी स्थानक
आकुर्डी येथील अभियांत्रिकी, व्यवस्थापनाची महाविद्यालये आहेत. यासोबतच केंद्रीय सदन असल्याने अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे हे स्थानक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी सोईचे ठरेल.

३. निगडी स्थानक
निगडी-प्राधिकरण स्थानक परिसराच्या आजूबाजूला शासकीय कार्यालये, नाट्यगृहे असल्याने सांस्कृत्रिक घडामोडी सुरू असतात. त्यामुळे या स्थानकामुळे मनोरंजनाची ठिकाणे जाडले जाइल. यामुळे नागरिकांचा प्रवास सोईचा होईल.

५. भक्ती-शक्ती स्थानक
या स्थानक परिसरातील धार्मिक स्थळ हे मेट्रो मार्गाशी जुळले जातील. यामुळे देहू, चिखली, तळेगाव आणि वडगावसारख्या
बाह्यक्षेत्रांना हा मार्ग जोडला जाणार. तसेच पीएमपीएमएल बस डेपोशी जोडणी करेल.


पीसीएमसी ते निगडी मेट्रो मार्गातील कामाचा वेग अधिक वेगात आहे. काही दिवसांपूर्वी निगडीपर्यंत बॅरिकेट्स टाकण्यात आले आहेत. काही महिन्यांत हे काम पूर्ण होईल.
- डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com