पिंपरी-चिंचवड
‘सकाळ मैत्रीण’ स्पर्धेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, ता. १ : ‘सकाळ मैत्रीण’ स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला माहितीचे भांडार उपलब्ध झाले आहे. आम्हाला आमची ओळख नव्याने निर्माण करण्याची संधी मिळत आहे, असा विश्वास पिंपरी चिंचवड शहरातील महिलांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवडमधील विविध सोसायट्या, संस्था व ‘सकाळ’ यांच्यावतीने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी महिलांचा संवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सिल्वर सिटी सोसायटी, जाधववाडी, निगडीतील मॉडर्न शाळा, वेस्टर्न अवेन्यू सोसायटी, काळेवाडी, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय याठिकाणी मैत्रीण स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.