निर्बंध झुगारून अवजड वाहने सुसाट

निर्बंध झुगारून अवजड वाहने सुसाट

Published on

पिंपरी, ता. ५ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत घडणाऱ्या रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या अवजड वाहनांनी दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा अपघातांच्या घटना रोखण्यासह वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी शहरातील बहुतांश रस्त्यांवरून सकाळी व सायंकाळी जड, अवजड वाहनांना प्रवेश मनाई केली आहे. या वेळेत शहरात धावणाऱ्या जड-अवजड वाहनांवर कारवाई देखील केली जात आहे. मात्र, तरीही शहरातील अनेक रस्त्यांवरून सकाळ, सायंकाळी गर्दीच्या वेळी जड, अवजड वाहने सुसाट धावत आहेत. अशा बेशिस्त अवजड वाहनांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध मार्गावर सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते नऊ यावेळेत अवजड वाहनांना प्रवेश मनाई केली होती. या वेळेत आता बदल करण्यात आला असून, सकाळी आठ ते दुपारी बारा तसेच दुपारी चार ते रात्री नऊ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, अवजड वाहनांना ठराविक वेळेत मार्गावरून प्रवेश मनाई असतानाही प्रतिबंधित वेळेतही जड अवजड वाहने या मार्गांवरून धावत असतात. आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसात घडलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये ट्रक, ट्रेलर, डंपर धडक दिल्याने दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अवजड वाहनांना प्रवेश मनाई असलेले मार्ग व वेळ
(सकाळी आठ ते दुपारी बारा व दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत प्रवेश मनाई)
- त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते आय.टी पार्क चौक ते महिंद्रा कंपनी
- देहूतील परंडवाल चौक-खंडेलवाल चौक आय टी पार्क चौक तळवडे गावठाण -चिखली गावठाण
- डायमंड चौक ते कुदळवाडी पूल
- कृष्णा चौक-साने चौक-नेवाळेवस्ती, पिंगळे चौक-सोनवणे वस्ती- ज्योतिबानगर चौक
- भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर चौक
- तळवडे ते भक्ती शक्ती चौक
- दुर्गा चौक ते टिळक चौक
- थरमॅक्स चौक ते खंडोबामाळ चौक
- चिखली पोलिस ठाणे ते शाहुनगर चौक ते केएसबी चौक
- डी. वाय. पाटील ते हँगिंग ब्रिज
- संभाजी चौक ते खंडोबामाळ चौक
- रिव्हर व्हयु चौक कडून महावीर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक
- खंडोबामाळकडून दळवीनगर, एस. के.एफ कंपनी चाफेकर चौक
- भोसरीतील पीएमटी चौक भोसरी तसेच पीएमटी चौक भोसरी ते भोसरी उडाणपूल
- मोशीतील जय भारतमाता चौक ते आनंदनगर कॉसमॉस सोसायटी
- नाशिक फाटा चौक ते हॅरिस पूल
- वाकड पुलावरून व वाकड नाका येथून इंडियन ऑइल चौक
- मुबई बंगळूर महामार्गावरून मायकार शोरूम येथून डावीकडे वळून हिंजवडी आयटी पार्ककडील मार्ग
- साखरे पाटील टी जंक्शन चौक ते विप्रो सर्कल फेज-१
- टी जंक्शन फेज-३ ते टाटा टी जंक्शन चौक
- विप्रो सर्कल फेज - १ ते माणगाव मार्गे बापुजीबुवा खिंड फेज -३
- म्हाळुंगेगाव व बालेवाडी गाव
- राजीव गांधी पूल रक्षक चौक मार्गे काळेवाडी फाटा उड्डाणपूल
- काळेवाडी फाटा ते तापकीर चौक मार्गे एन. एम.चौक एम्पायर इस्टेट
- कस्पटे चौक ते सावित्रीबाई फुले चौक
- म्हसोबा चौक मार्गे पिंपळे गुरव
- वाकडनाका ते कस्पटे चौक
- बिर्ला रुग्णालय ते भूमकर चौक
- जिंजर हॉटेल ते भूमकर चौक

- मायकार शोरूम ते भुमकर चौक
- जॅग्वार शोरूम येथून भूमकर चौक
- वाकडगाव चौकाकडून दत्तमंदिर रस्ता
- तापकीर चौक ते थेरगाव फाटा

- ताथवडे व पुनावळे अंडरपास
- सुसखिंड ते नांदे गाव
- पिंपरी पुलावर आल्यानंतर डावीकडे वळताना व शगुन चौक मार्गावर
- भाटनगर कॉर्नर या ठिकाणी मुख्य बाजारामध्ये जाणे-येणेच्या मार्गावर
- पिंपरीतील शगुन चौक ते साई चौक आर्य समाज चौक
- शगुन चौक ते डीलक्स चौक काळेवाडी पुलापर्यंत
- साई चौक ते गेलार्ड चौक
- देहूरोड येथील स्वामी चौकातून देहूरोड बाजारात व सवाना चौकातून देहूरोड बाजार
- मुकाई चौकातून रावेतकडील मार्गावर
- मुकाई चौक व कृष्णा चौक
- हुंडाई सर्कल ते खालुंब्रे
- चाकण मार्गे तळेगाव बाजूकडे जाण्यास व तळेगाव बाजूकडून चाकणकडे येण्यास
-------------------------------------
(सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत प्रवेश मनाई)
- देहूफाटा चौक ते चाकण चौक
- चाकण चौक ते वडगाव चौक
- वडगाव चौक ते मरकळ चौक
- मरकळ चौक ते देहूफाटा
- धानोरी फाटा ते मरकळ चौक
- मरकळ गाव ते तुळापूर
---------------------------
(अवजड वाहनांना पूर्ण वेळ प्रवेश मनाई)
- देहू कमान देहूरोड ते देहूगाव परंडवाल चौक
- मरकळ गाव ते तुळापूर
- देहूतील खंडेलवाल चौक ते विठ्ठलवाडी ते देहूगाव कमान
- देहूगाव मुख्य कमान ते चौदा टाळकरी कमान ते सांगुर्डी फाटा
- परंडवाल चौक ते देहूगाव मुख्य कमान
- भैरवनाथ चौक ते चौदा टाळकरी कमान

पन्नास हजार ७१४ वाहनांवर कारवाई
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने एक जानेवारी ते ३० जून या कालावधीत नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धावणाऱ्या ५० हजार ७१४ जड, अवजड वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत सहा कोटी ५७ लाख १४ हजार ९५० रुपयांचा दंड संबंधित वाहनांवर आकारला आहे.
------------------
या वर्षातील प्राणांतिक अपघात
महिना घटना
जानेवारी ३२
फेब्रुवारी २६
मार्च २९
एप्रिल ३२
मे ३२
जून २७
--------------------------------
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या वाहनांवर वेळोवेळी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे. वाहन चालकांनाही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

फोटो आयडी - ३६७११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com