वृक्ष संवर्धनासाठी साधू निसर्गाशी ‘मैत्री’

वृक्ष संवर्धनासाठी साधू निसर्गाशी ‘मैत्री’

Published on

पिंपरी, ता. २ ः पर्यावरण संवर्धन आणि वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. शिवाय, यावर्षी संत ज्ञानेश्वर माउली यांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून ‘यशदा रिॲलटी’ आणि ‘सकाळ माध्यम समूहा’ने २४ ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचा संकल्प सोडला आहे. त्यामध्ये सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रत्येकाला जगण्यासाठी प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची गरज असते, आणि तो देण्याचे काम झाडे म्हणजेच वृक्ष करत असतात, हे सर्वमान्य आहे. मात्र, शहरीकरणाच्या नादात अनेक ठिकाणी झाडे तोडले जातात आणि प्रदूषण वाढते. त्याचा कळत-नकळत सर्वांवर परिणाम होतो. त्यापासून वाचण्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे. याबाबत संत ज्ञानेश्‍वर माउली असोत की जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज या सकल संतांनी निसर्गाचे अर्थात झाडांचे महत्त्‍व अधोरेखित केले आहे. संत तुकाराम महाराज यांनी तर, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे...’ असा सोयरेपणाचा संदेश दिला आहे. हाच वारसा जपण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘यशदा रिॲलटी’ यांनी ‘MyTree ः मैत्री’ असा वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प केला आहे. त्याअंतर्गत २४ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यामध्ये सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

‘एक कुटुंब, एक झाड’
‘यशदा रिॲलिटी’ हे बांधकाम क्षेत्रातील नामांकित नाव आहे. ग्राहकांना परवडतील असे गृहप्रकल्प उभारून त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करून द्यायचे, हा त्यांचा प्रमुख उद्देश असला तरी, निसर्गाचे व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेतून ‘वृक्षारोपण आणि संवर्धनाचा’ वसा त्यांनी घेतला आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ची साथ त्यांना लाभली आहे. ‘एक सदनिका, एक झाड’ अर्थात ‘एक कुटुंब, एक झाड’ अशी ही संकल्पना आहे.

तीन वर्ष राखणार निगा
केवळ वृक्षारोपण करायचे नसून पुढील तीन वर्ष त्याचे संगोपन व संवर्धनही केले जाणार आहे. त्यासाठी नैसर्गिक खत, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जनावरांपासून संरक्षणासाठी प्रत्येक रोपाची निगा राखली जाणार आहे. ‘यशदा रिॲलटी’च्या ग्राहकांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले जाणार आहे. सुमारे दोन हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. शिवाय, यापूर्वी विक्री केलेल्या सदनिकाधारकांच्या हस्तेही वृक्षारोपण केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ः अक्षय - ९५६१३१४६७९
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com