अग्निशमन दलाचे मॉकड्रील (फोटो फिचर)

अग्निशमन दलाचे मॉकड्रील (फोटो फिचर)
Published on

अग्निशमन दलाचे ‘मॉकड्रिल’

पिंपरी : संत तुकारामनगर येथील डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल येथे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मोठी आग लागल्याची वर्दी संत तुकारामनगर येथील अग्निशमन केंद्राला मिळते...सायरन वाजवत अग्निशमन दलाचे बंब दाखल होतात...जवानांची धावपळ सुरू होताच बघ्यांचीही गर्दी वाढते.... वातावरण गंभीर झाले असतानाच हे केवळ ‘मॉकड्रिल’ अर्थात आपत्कालीन घटनेची रंगीत तालीम असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून गुरुवारी (ता. १७) ‘मॉकड्रिल’ घेण्यात आले. यावेळी उंच ‘स्काय लिफ्ट’चा वापर करण्यात आला. यामध्ये १५ जवान सहभागी झाले. त्यांनी यावेळी दहा नागरिकांचे प्राण वाचवले. धुरामुळे बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला जवानांनी त्वरित बाहेर काढत रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात पाठवले. तसेच आगीवर पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळवले. अवघ्या पंधरा मिनिटांत त्यांनी ही कामगिरी चोख पार पाडली. दरवर्षी एप्रिलमध्ये ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात येतो. आपत्कालीन व आगीच्या प्रसंगाची पूर्वतयारी म्हणून ‘मॉकड्रिल’ आयोजित केले जातात.
(संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com