देवगड हापूस खातोय भाव

देवगड हापूस खातोय भाव
Published on

पिंपरी, ता. ४ ः आंब्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा देवगड हापूस आंबा यंदाही आपल्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. दरवर्षीप्रमाणे देवगड हापूसची खास चव चाखण्यासाठी सुरुवात झाली असून, आंबाप्रेमींसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. मात्र, या आंब्यांचे भाव सध्या गगनाला भिडलेले असून, आवक वाढल्यानंतर त्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आता व्यापारी घरबसल्या आंब्याच्या पेट्या पोहोचवत असून, अगदी मुंबई आणि पुणे शहरांमध्ये दोन डझन किंवा त्याहून अधिक आंब्यांच्या मागणीवर मोफत घरपोच सुविधा काही व्यापाऱ्यांकडून दिली जाणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक कुटुंबे या हंगामाची आतुरतेने वाट पाहत होती. मात्र, सध्या हापूस आंब्याची आवक कमी असल्याने दर जास्त आहेत. त्यामुळे नागरिकांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

आंब्याचे दर
वजन (ग्रॅममध्ये) - प्रतिडझन रुपये
२०० ते २५० - १८००
१७० ते २०० - १६००
१५० ते १७० - १३००
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com