तापमानवाढीमुळे नागरिकांनी काळजी घ्यावी ः डॉ. सूर्यवंशी

तापमानवाढीमुळे नागरिकांनी 
काळजी घ्यावी ः डॉ. सूर्यवंशी
Published on

सोमाटणे, ता. ४ ः तापमान वाढीमुळे उष्माघात किंवा इतर आजाराची शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी, शेतीची कामे सकाळ-संध्याकाळ करावी, भरपूर व शुद्ध पाणी प्यावे असे आवाहन आढले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप सूर्यवंशी यांनी केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून तापमान वाढले असून, पारा चाळीस अंशाच्या वर गेला आहे. तापमान वाढीमुळे उष्माघात किंवा इतर आजार होण्याचा धोका अधिक असतो. उष्णतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीची कामे सकाळी लवकर व संध्याकाळी तापमान कमी झाल्यावर करावी. दुपारच्यावेळी विश्रांती घ्यावी, शरीराच्या गरजेप्रमाणे भरपूर पाणी प्यावे, शुद्ध पाणी असल्याची खात्री करावी, प्रसंगी पाणी उकळून ते थंड करून प्यावे, डोंगर-दऱ्यात दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांनी पाणी नियमित उकळून थंड करून प्यावे. उन्हामुळे त्रास होत असल्याची जाणीव होताच त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र आढले येथे संपर्क साधावा.
ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विहीर, साठवण टाकी शुद्ध ठेवावी, पाणी शुद्धीकरणासाठी नियमित जंतुनाशकाचा वापर करावा, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com