कुदळवाडीतील लघुउद्योगांचे ‘एमआयडीसी’त पुनर्वसन करा आमदार लांडगे यांची महापालिका प्रशासनाला सूचना

कुदळवाडीतील लघुउद्योगांचे 
‘एमआयडीसी’त पुनर्वसन करा
आमदार लांडगे यांची महापालिका प्रशासनाला सूचना
Published on

पिंपरी, ता. ९ ः कुदळवाडीमध्ये महापालिकेने सरसकट अतिक्रमण विरोधी कारवाई केली. अवैध भंगार दुकाने हटविली. मात्र, काही लघुउद्योजकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे भोसरी एमआयडीसी आरक्षण क्रमांक ४० प्लॉट क्रमांक टी २०१ मध्ये लघुउद्योजकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली.
आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, भोसरी एमआयडीसी आरक्षण क्रमांक ४० मध्ये लघुउद्योजकांचे पुनर्वसन करण्यासाठी इमारत उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. त्याला १६ जून २००८ रोजी कार्यादेश दिला आहे. मात्र, काम अद्याप अपूर्ण आहे. या प्रकल्पात दोन इमारती असून, २०८ औद्योगिक गाळे नियोजित आहे. त्यांचे क्षेत्रफळ २९२ ते ६३० चौरस फुटांपर्यंत आहे. वरील मजल्यावर वाहतुकीसाठी रॅम्प, फायरफायटिंग सिस्टम व लँडस्केपिंग, मेटेरिअल व पॅसेंजर लिफ्टची सुविधा असतील. येथील गाळ्यांचे वितरण पात्र व्यक्तींना तर, उर्वरित गाळे लिलाव पद्धतीने वितरित करण्याचे प्रस्तावित आहे. या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे.

‘‘कुदळवाडीतील लघुउद्योजकांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाने आरक्षण क्रमांक ४० मधील प्रकल्पाचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा. इमारतीचे काम तातडीने मार्गी लावावे. २०८ गाळ्यांमध्ये कुदळवाडीतील लघुउद्योजकांना प्राधान्य द्यावे. त्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसा पाठपुरावा करीत आहोत.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com