आमच्या मुलीला तुझ्या भावानं पळवून नेलंय, तिला आणून दे आणि वडिलांना घेऊन; प्रेमप्रकरणातून अपहरण

तरुणाने तरुणीला पळवून नेल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तरुणाच्या वडिलांचेच अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक कऱण्यात आलीय.
आमच्या मुलीला तुझ्या भावानं पळवून नेलंय, तिला आणून दे आणि वडिलांना घेऊन; प्रेमप्रकरणातून अपहरण
Published on

पिंपरी, ता. १० : प्रेमप्रकरणातून तरुणाने तरुणीला पळवून नेले. त्यावर तिच्या नातेवाईकांनी तरुणाच्या वडिलांचे अपहरण केले. ही घटना मारुंजी येथे घडली. या प्रकरणी तरुणाने हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘‘बुधवारी सकाळी मारुंजीतील सरकार चौक येथे आरोपी एका गाडीतून आले. त्यांनी आमच्या मुलीला तुझ्या भावाने पळवून नेले आहे. त्यांना आणून दे आणि तुझ्या वडिलांना घेऊन जा’’, असे म्हणत फिर्यादी व त्यांचे वडील यांना मारहाण केली. तसेच पोलिसांत तक्रार दिली तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांचे अपहरण केले.

हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली असता तत्काळ तपासासाठी पथके रवाना करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणासह मिळालेल्या माहितीनुसार तपास करून अपहरण केलेल्या फिर्यादीच्या वडिलांचा पोलिसांनी शोध लावला. रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी अपहृत व्यक्तीची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com