‘स्वच्छ-हरित’ योजनेला प्रमोद महाजनांचे नाव

‘स्वच्छ-हरित’ योजनेला
प्रमोद महाजनांचे नाव
Published on

पिंपरी, ता. १४ ः स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड शहर योजना’ लवकरच सुरू करण्यात येईल. ही योजना महापालिका आणि लोकसहभागातून यशस्वी करण्यात येईल, असे महापौर रवी लांडगे यांनी जाहीर केले.
महापालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन, शहरात हरित क्षेत्र वाढ आणि नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात आयोजित बैठकीत महापौर लांडगे बोलत होते. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्या शैलजा मोरे, नगरसदस्य अमित गावडे आदी उपस्थित होते. महापौर लांडगे म्हणाले, ‘‘वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान लक्षात घेता पर्यावरण संतुलन राखणे ही आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. महापालिका नागरिकांना रोपे, खत व आवश्यक तांत्रिक सहकार्य करेल. शहरात पुढील काळात तब्बल दोन लाख वृक्षारोपणाचा मानस आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग घ्यावा.’’ सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी आभार मानले.

डेन्ट फॉरेस्ट विकसित करणार ः आयुक्त
महापालिकेच्या राखीव भूखंड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे नियोजन आहे. तसेच निवडक ठिकाणी ‘डेन्स फॉरेस्ट’ विकसित करण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील हरित क्षेत्रात मोठी वाढ तर तापमानात घट होईल. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहर उभारण्यासाठी महापालिका विविध उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com