

पिंपरी, ता. २८ : निगडी प्राधिकरणातील बीएसएनएल डक्टमध्ये दोन मजुरांच्या मृत्यूला ४४ तास उलटूनही गुन्हा दाखल झालेला नाही. जबाबदारी निश्चित होत नसल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिस सांगत आहेत. त्यामुळे मृत्यूस कोण जबाबदार आहे, हे शुक्रवारी रात्री नऊपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
दरम्यान, बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘आमच्या कंपनीने तेथे कामगार पाठविले नव्हते. ठेकेदारांकडेही चौकशी केली असता त्यांनीही कामगार पाठवले नसल्याचे स्पष्ट केले. तरीही आमच्याकडून चौकशी सुरू आहे.’ या पार्श्वभूमीवर हे तरुण तेथे नेमके कशासाठी गेले होते, त्यांना काम करायला कोणी सांगितले होते, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
नातेवाईक बेपत्ता
मृत मजुरांसह त्यांच्या तीन नात्यातील व्यक्ती होत्या. त्या सध्या बेपत्ता असून त्यांचे मोबाईलही बंद आहेत. त्यांच्या तपासासाठी एक पथक पाठवले असून चौकशीनंतर नेमका काय प्रकार घडला, हे समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. दुर्घटनास्थळी पोलिसांना दोन दुचाकी तसेच खोदाईच्या कामासाठी लागणारे टिकाव, दोन मोबाइल व इतर साहित्य आढळले.
---
मृत मजुरांबरोबर आणखी तिघेजण होते. त्यांच्या शोधासाठी एक पथक रवाना केले आहे. मजूर डक्टमध्ये का उतरले होते, त्यांना कुणी कामासाठी पाठविले होते का, हे स्पष्ट झाल्याशिवाय जबाबदारी निश्चित करता येणार नाही. बीएसएनएल अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता कामगार आम्ही पाठवले नसल्याचे सांगण्यात येत आहे. अधिक तपास सुरू आहे.
- प्रशांत ढोले, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.