

पिंपरी, ता. ७ ः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) विविध विभागांत २११ कंत्राटी कर्मचारी आहेत. त्याचे कंत्राट ‘बीव्हीजी’ कंपनीकडे आहे. ते कंत्राट संपुष्टात आल्याने नव्याने सहा निविदा मागवण्यात आल्या आहेत.
तूर्तास ही प्रक्रिया सुुरू असल्याने ‘बीव्हीजी’ला तात्पुरती मुदतवाढ दिली आहे. प्राधिकरणात राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी सेवेत आहेत. प्रत्यक्षात चारशे अधिकारी, कर्मचारी मनुष्यबळाची गरज असताना, ४० टक्केच अधिकारी वर्गावर भार आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. दरम्यान, कंत्राट संपुष्टात आल्यानंतर आता नव्याने निविदा मागवल्या आहेत. त्यानुसार ‘पीएमआरडीए’ प्रशासनाकडे ६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याची छाननी सुरू आहे. अंतिम निर्णयासाठी आयुक्तांकडे ती माहिती पाठवली जाणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत त्यावर निर्णय होईल.