

पिंपळे सौदागर भागात अपुरा पाणी पुरवठा
पिंपळे सौदागर येथील विश्वासांती कॉलनी, लेन क्र. २ मध्ये सध्या दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातही पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने अनेक घरांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजा भागविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांतून होणारा पाणीपुरवठा आणि त्यात कमी दाब असल्याने उपलब्ध पाणी साठवणेही नागरिकांसाठी कठीण झाले आहे. परिणामी, नागरिकांना अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करावी लागत असून त्यासाठी वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाढत आहे. महापालिका प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करावी. तसेच नियमित, पुरेशा प्रमाणात आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- अजय केदारी, पिंपळे सौदागर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.