दादांचा फोन अन् कार्यकर्त्यांना बळ

दादांचा फोन अन् कार्यकर्त्यांना बळ

Published on

पिंपरी, ता. २९ : नुकत्‍याच झालेल्‍या महापालिकेच्‍या निवडणुकीदरम्‍यान प्रभागात झालेल्‍या गोंधळाची पाच मिनिटे चौकशी करून माहिती घेत पाठीशी असल्‍याचे बळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. गंभीर असलेल्‍या प्रत्‍येक प्रश्‍नात आपुलकीने चौकशी करणारे दादा आपल्‍यात नाहीत, हे सहन होत नसल्‍याची भावना शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख यांनी व्‍यक्‍त केली. तसेच २६ जानेवारी रोजी मित्राच्‍या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलो होतो. ही भेट शेवटची ठरेल, असे वाटले नसल्‍याचेही ते म्‍हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या निधनाने पक्षातील सर्वसामान्‍य पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांविषयी बोलताना भावना व्‍यक्‍त केल्‍या.

तीन स्‍वीकृत सदस्यांच्‍या जागेसाठी चार अर्ज दाखल झाले होते. त्‍या वेळी एकाने पक्षविरोधी काम केल्‍याने त्‍यांना पद न देत अजित दादांनी मला माझी वर्णी लावली. या काळात मावळातील चिघळलेल्‍या पाणीप्रश्‍नावर शहराच्‍या पाण्याचा प्रश्‍न महत्त्वाचा असल्‍याचे मी अधोरेखित केले. त्‍या वेळी दादांनी स्‍वतः मला संपर्क करून कौतुक केले होते.
- विनायक रणसुभे, माजी स्‍वीकृत सदस्य, महापालिका

पदावर असताना आम्‍ही नागरिकांचे काम न केल्‍यास अजित पवार यांचा फोन येणार हे ठरलेलेच होते. कडक हेडमास्‍तरसारखे जाब विचारून काम मार्गी लावण्याच्‍या सूचना द्यायचे. दादांची आदरयुक्‍त भीती होती. माझ्यासारख्या सर्वसामान्‍य पदाधिकाऱ्याला त्‍यांनी शिक्षण मंडळ सभापती केले. मुंबईत काम घेऊन गेल्‍यास एवढ्या लांब का आलास. पुण्यात भेटता येत नाही का म्‍हणून चिडायचे. ते चिडले की आमचे काम नक्‍की होणार असा विश्‍वास आम्‍हाला होता.
- विजय लोखंडे, माजी सभापती, शिक्षण मंडळ, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com