वृक्षारोपणाची देखभाल नसल्याने खर्च वाया
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वाकड व अन्य भागांत रस्ते व पदपथांवर वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र, वृक्षांना वेळेवर पाणी दिले जात नसल्याने तसेच वृक्षाच्या संरक्षणासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेक वृक्ष नष्ट होत आहेत. वृक्षांची नियमित देखभाल केली जात नाही. परिणामी, वृक्षारोपणावर दरवर्षी जनतेच्या करातून होणारा खर्च वाया जात आहे. शहरातील प्रदूषण वाढत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. तरी महापालिकेने वृक्षांना नियमित पाणी देऊन त्यांच्या संरक्षणासाठी ‘ट्री गार्ड’ बसवावे.
- दिलीप बाफना, वाकड
PNE26V90785
नाल्याच्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी
पीसीएमटी चौकातील गव्हाणे वस्ती येथील करसंकलन कार्यालयासमोरील नाला दररोज तुडुंब भरून मुख्य रस्त्यावर सांडपाणी येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत तक्रार करूनही तात्पुरती कामे करून सोडून दिली जात आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
- सुभाष केदारी, गव्हाणे वस्ती
PNE26V90788
हॉटेल्समुळे परिसर अस्वच्छ
आकुर्डी रेल्वे स्थानक ते गंगानगर रस्त्यावर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून नियमित स्वच्छता केली जाते, त्याबद्दल त्यांचे आभार. मात्र, त्या परिसरातील काही हॉटेल्समुळे सतत अस्वच्छता निर्माण होत आहे. हॉटेल मालकांवर नियम लावून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी.
- एक नागरिक
PNE26V90789
पाणीपुरवठा पाइपलाइनला गळती
आदित्य बिर्ला हॉस्पिटलकडून चिंचवडकडे जाताना नदीवरील पुलाच्या कोपऱ्यावर पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
- राजेश डावरे, चिंचवड
PNE26V90787
पदपथावर दुचाकी पार्किंगचा त्रास
चिंचवड स्टेशन-लक्ष्मी कॉर्नर परिसरात नवीन पदपथ व सायकल ट्रॅक नागरिकांच्या चालण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. मात्र, या पदपथांवर व सायकल ट्रॅकवर सर्रास दुचाकी पार्क केल्या जात आहेत. तसेच दुकानांचे मोठे फलकही पदपथावरच लावलेले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.
- उदय नवले, चिंचवड स्टेशन
PNE26V90799
फुटलेल्या चेंबरमुळे अपघाताचा धोका
पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते जगताप डेअरीलगत, कुणाल आयकॉनकडे जाणाऱ्या मागील रस्त्यावरील मध्यभागी असलेले सांडपाण्याचे चेंबर गेल्या चार महिन्यांपासून फुटलेले आहे. या ठिकाणी अनेक वाहने अडकली असून, काही नागरिक पाय घसरून चेंबरमध्ये पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असतानाही महापालिका व संबंधित क्षेत्रीय कार्यालय दुर्लक्ष करत असल्याची भावना आहे. चेंबरची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
- संजय जाधव, पिंपळे सौदागर
PNE26V90791
नाला स्वच्छ न केल्याने आरोग्याचा प्रश्न
वाकड येथील पोस्टल कॉलनीतील नाला अनेक दिवसांपासून स्वच्छ करण्यात आलेला नाही. त्यात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दुर्गंधी असह्य झाली असून, हा परिसर गंभीर आरोग्य समस्येच्या उंबरठ्यावर आहे. अनेक घरांमध्ये डेंगी व चिकनगुनियाचा प्रादुर्भाव झाला आहे.
- अशोक मोरवाल, पोस्टल कॉलनी, वाकड
PPNE26V90786
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

