ग्रंथदिंडीतून उलगडले संत ज्ञानेश्वरांचे जीवनदर्शन

ग्रंथदिंडीतून उलगडले संत ज्ञानेश्वरांचे जीवनदर्शन

Published on

पिंपरी, ता. ३ : आय स्क्वेअर आयटी महाविद्यालयात वाचक मंच व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या पुढाकाराने ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थी वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. टाळ-मृदंगांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
या ग्रंथदिंडीने व विद्यार्थ्यांच्या सहभागातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
महाविद्यालयात ग्रंथदिंडीचा उपक्रम सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आला होता. या वर्षी ग्रंथदिंडीची संकल्पना संत ज्ञानेश्वर यांच्या जीवन व कार्यावर आधारित होती. देवगिरीचा पराभव, पैठण येथील शास्त्रार्थ, भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) यांचे कथन, आषाढी एकादशीची वारी, चांगदेव महाराजांशी झालेली ऐतिहासिक भेट तसेच संजीवन समाधी यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रसंगांचे नाट्यरूप सादरीकरण विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले. वारीतील रिंगणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास प्राचार्या वैशाली पाटील, प्राध्यापकवर्ग तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक संस्कार घडविण्यास हातभार लागत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com