संत तुकोबाराय क्रांतिकारी विचारांचे प्रबोधनकार : जाधव
पिंपरी, ता. ३ : ‘‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन केले. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा, विषमता या विरोधात त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आवाज उठवला. समाजाला जागृत करण्याचे काम केले. देव दगडाच्या मूर्तीत नसून, गोरगरिबांना मदत करण्यात आहे,’’ असे प्रतिपादन मराठा सेवा संघाच्या शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले.
संत तुकाराम महाराज यांच्या ४१८ व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या वतीने संत तुकाराम महाराज पुतळा मंदिर वल्लभनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक अॅड. लक्ष्मण रानवडे, वसंत पाटील, दिलीप गावडे, प्रकाश बाबर, अशोक सातपुते, सुरेश इंगळे, जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्षा सुलभा यादव, कौशल्या जाधव, वंदना क्षीरसागर, करुणा यादव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक व जगद्गुरू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी केले होते. सूत्रसंचालन सुरेश इंगळे यांनी केले. आभार वसंत पाटील यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

