जिल्हा रुग्णालयात डोळ्यांची तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर
पिंपरी, ता. ३ : जिल्हा रुग्णालयात डोळ्यांचा तिरळेपणा तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. यात तिरळेपणाच्या ७१ आणि डोळ्यांच्या स्नायूंवर ८५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
औंध जिल्हा रुगणालय व पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान रोटरी क्लब स्पोर्टस पुणे व लायन्स क्लब पिंपळे सौदागर ॲक्टिव्ह यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आरोग्य अतिरिक्त सहसंचालक डॉ. सचिन सरदेसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांचे हस्ते करण्यात आले. शिबिराचा समारोप रविवारी (ता. एक) अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमित लव्हेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यकमास प्रमुख अतिथी व नेत्र सेवा प्रतिष्ठानचे नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर व रोटरीचे सचिव डॉ. राजेश पवार आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ. राजेश थोरात, डॉ. विक्रम काकडे, डॉ. प्रज्ञा निकम, डॉ. प्रिया हरदास, डॉ. संतोष भोंडवे, मयुरी मंगरुळकर, पूजा राठोड, हेमलता गावित व अधिपरिचारिका आणि इतर सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले .

