‘नृत्यंजली’ कार्यक्रम
निगडीमध्ये उत्साहात

‘नृत्यंजली’ कार्यक्रम निगडीमध्ये उत्साहात

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३ ः नृत्यकला मंदिर आयोजित ‘नृत्यंजली’ हा नृत्यरुपीपुष्प भरतनाट्यम नृत्यावर आधारित कार्यक्रम शनिवारी (ता. ३१) निगडीतील मनोहर वाढोकर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. भरतनाट्यमच्या सुप्रसिद्ध गुरू तेजश्री अडिगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मॉरिशस महाराष्ट्र मंडळ फेडरेशनचे अध्यक्ष बलराज नारू, सदस्य रवीन राव आणि मॉरिशस-भारत कल्चरलचे रिलेशन कमिशनर संदीप जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी मुकादम, नगरसेविका शैलजा मोरे, संस्थेचे विश्वस्त अविनाश अडिगे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘श्लोकम’ने कार्यक्रमाची सुरवात झाली, सात वर्षांच्या विद्यार्थिनींनी पुष्पांजली सादरीकरण करून टाळ्यांची दाद मिळवली. तसेच विद्यार्थिनींनी विविध ‘अडवू’चे सादरीकरण केले. त्याचबरोबर अलारीपू, गणेश कीर्तन, सरस्वती कौतुकम, शिव आणि पार्वती यांच्यावरील अभिनय पद, तिल्लाना आणि मंगलम असे पारंपारिक भरतनाट्यमच्या नृत्य रचना सादर केल्या.
या कार्यक्रमांमध्ये मृदंगवर एच. वेंकटरमण, गायनाची साथ महती गुरुमूर्ती यांनी तर व्हायोलिनवर अजय चंद्रमौली यांनी साथ दिली. यावेळी माहेश्वरी जोशी, वीणा भोसले, हरिप्रिया चौधरी व विशेष कार्याबद्दल वैष्णवी शर्मा यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन विद्या जोशी यांनी केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com