वाचक लिहितात...
वाचक लिहितात...
------------------
महापालिकेने जनसंवाद सभा
पूर्वीप्रमाणे सुरू ठेवाव्यात
महापालिकेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता व नागरिकांच्या सहभागासाठी जनसंवाद सभा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट होते. पूर्वीप्रमाणे नियमितपणे जनसंवाद सभा घेतल्या जात असताना नागरिकांना थेट आपली समस्या, सूचना व अपेक्षा प्रशासनासमोर मांडण्याची प्रभावी संधी मिळत होती. सभांमुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक सशक्त होऊन प्रश्नांचे वेळीच निराकरण, गैरसमज दूर होणे तसेच विश्वासार्हता वाढण्यास मोठी मदत होत होती. सध्या या सभांचा अभाव जाणवत असून, त्यामुळे अनेक स्थानिक प्रश्न थेट मांडण्याची संधी नागरिकांना मिळत नाही. याबाबत सकारात्मक विचार करून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभा पूर्वीप्रमाणे नियमित, नियोजित व सर्व प्रभागांमध्ये सुरू कराव्यात, ही नम्र मागणी आहे.
- शिवानंद चौगुले, चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

