अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड शाखेची कार्यकारणीची निवड
पिंपरी, ता. ७ ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड शाखेची वार्षिक बैठक पार पडली. या प्रसंगी नूतन वर्ष २०२६ साठी कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. योगेश गाडेकर यांची तर कार्याध्यक्ष पदी विकास सूर्यवंशी, प्रधान सचिव पदी गणेश तामचीकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी निरीक्षक म्हणून पुणे जिल्हा प्रधान सचिव संजय बारी व राज्य कायदे विभागाच्या कार्यवाह ॲड. मनीषा महाजन यांनी कामकाज पाहिले. ॲड. महाजन यांनी समितीची ओळख, पंचसूत्री, समितीचे कामकाज याबद्दल माहिती दिली.
देविदास इंगळे उपाध्यक्ष, कृष्णा भिसे विविध उपक्रम विभाग कार्यवाह, दर्शन देवकांत सहकार्यवाह, राजकुमार माळी वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग कार्यवाह, क्रांती दांडेकर सहकार्यवाह, रोहिणी कांबळे महिला विभाग कार्यवाह, भावना फुलझेले सहकार्यवाह, संजय साकळे व्यसनमुक्ती विभाग कार्यवाह, सिद्दीक शेख बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह, ज्ञानेश महाजन युवा विभाग कार्यवाह, अशोक अगुंडे सहकार्यवाह या प्रमाणे कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यावेळी ॲड. रमेश महाजन, संदीप नवले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घस्ते, पौर्णिमा घाडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

