सोमाटणेत शांततेत मतदान

सोमाटणेत शांततेत मतदान

Published on

सोमाटणे ः मतदान शांततेत सुरु झाले. दुपारपर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पवनमावळ पूर्व विभागातील जिल्हापरिषद, पंचायत समितीचा सोमाटणे गट व गणात तर पंचायत समितीच्या चांदखेड गणात मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी सोमाटणे, गहुंजे, सांगवडे, दारुंब्रे, गोडुंब्रे, साळुंब्रे, कुसगाव, चांदखेड, आढले येथील नागरिकांनी मतदान केंद्रावर उत्साही वातावरणात गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. सर्वच मतदान केंद्रांवर आवश्यक तेवढा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नेहमीपेक्षा आज प्रत्येक गावातील मतदारांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारपर्यंत सोमाटणे विभागात एकूण १९६६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धडपड सुरु होती.
-------
फोटो
93544

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com