पंडित उपाध्याय विद्यालयात इंग्रजी माध्यम सुरु करावे

पंडित उपाध्याय विद्यालयात
इंग्रजी माध्यम सुरु करावे
Published on

पिंपरी, ता. ७ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधील संत तुकारामनगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यालयात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका मनिषा शाम लांडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या विद्यालयात सध्या मराठी माध्यमाची शाळा सुरु आहे. प्रभाग क्रमांक २० मध्येच कासारवाडी येथे आकांक्षा फाउंडेशनच्या वतीने छत्रपती श्री शाहू महाराज इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु आहे. याच धर्तीवर इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात यावी. आकांक्षा फाउंडेशन व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या मध्ये पूर्वीच करार झाला आहे.
संत तुकारामनगर मध्ये डॉ. डी. वाय. पाटील इंग्रजी माध्यमाची शाळा व जी. जी. इंटरनॅशनल या शाळा असून या शाळांमध्ये जास्त शालेय शुल्क आकारले जाते. पंडित उपाध्याय विद्यालयात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु झाल्यानंतर प्रभागातील व आजूबाजूच्या परिसरातील सामान्य कुटुंबांतील व गोरगरीब मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण उपलब्ध होईल. त्यामुळे या शाळेच्या प्रस्तावासाठी आकांक्षा फाउंडेशन, महापालिकेचे संबंधित अधिकारी व स्थानिक नगरसेवकांची बैठक आयोजित करावी व पंडित उपाध्याय विद्यालयात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यासाठी अंमलबजावणी करावी, असे मनिषा लांडे यांनी निवेदनात म्हटले आहे. आयुक्तांना निवेदन देताना प्रभाग क्रमांक २० मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शाम लांडे, नगरसेवक जितेंद्र ननावरे, नगरसेविका वर्षा जगताप उपस्थित होते.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com