शेतातील जुनी गोफण होतेय कालबाह्य

शेतातील जुनी गोफण होतेय कालबाह्य

Published on

सोमाटणे, ता. ८ ः गोफण फिरवता येत नसल्याने ज्वारी पिकावर बसणारे पक्षी उडविण्याची गोफण कालबाह्य झाली असून त्याची जागा लोखंडी डब्यांनी घेतली आहे.
ज्वारीच्या हंगामात कणसे दानेभरणीला आल्यानंतर पक्षांचे थवे पिकावर बसतात, प्रसंगी पक्षी संपूर्ण शेतातील पीक फस्त करतात. या पक्षांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकरी मागील अनेक वर्षांपासून गोफणीचा वापर करत आहेत. योग्य आकाराचा दगड गोफणीमध्ये बसवून ती विशिष्ट पद्धतीने फिरवून शेपटीकडील भाग एकदम सोडल्यास त्यातील दगड वेगाने बाहेर पडून पक्षांच्या दिशेने जात. दगडाच्या व गोफणीच्या या आवाजाने पक्षी दूरवर निघून जात, गोफणीची ही पद्धत जुनी झाली तरीही गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरु होती. परंतु गोफण फिरविणे ही पद्धत अतिशय कठीण असल्याने काळाच्या ओघात ती नामशेष होत चालली असून पुढील पिढीत गोफण चालवणे ही पद्धतच कालबाह्य ठरली आहे. नवीन पिढीला याचे फारसे ज्ञान नसल्यामुळे गोफण फिरविण्याची पद्धत लोप पावत आहे.

पूर्वीची गोफण ही आताच्या शेतकऱ्यांना फिरवता येत नसल्याने व फिरवण्याच्या प्रयत्नात दगड आपणास लागण्याची भीती असल्याने पिकावर बसलेले पक्षी उडविण्यासाठी मचानावर उभे राहून डब्याचा आवाज करावा लागतो.
- युवराज पशाले, शेतकरी आढले

PNE26V93587

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com