चिखलीगाव परिसरातील विकास कामे मार्गी लावा

चिखलीगाव परिसरातील विकास कामे मार्गी लावा

Published on

चिखली, ता.७ : चिखली परिसरातील मूलभूत सुविधांबरोबरच इतर विकास कामे त्वरित करावीत, अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेवकांकडून शनिवारी करण्यात आली.
चिखली ग्रामस्थांच्यावतीने बैठकीत बोलावण्यात आली. त्याबैठकीत ही मागणी करण्यात आली. तसा ठराव मंजूर करून तो महापालिका आयुक्त यांना देण्यात आला. चिखली परिसरातील रस्ते, पाणी या सुविधांबरोबरच चिखली चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकरात लवकर उभारला जावा. तसेच टाळगाव चिखली येथे टाळ शिल्प उभारणी,
गायरान विकास व सुशोभीकरण, क्रीडा संकुल, रुग्णालय उभारणी, बैलगाडा घाटाचे सुशोभीकरण
अग्निशमन केंद्र उभारणी इत्यादी विकास कामे त्वरित मार्गी लावावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक विकास साने विकास कामांबद्दल मार्गदर्शन केले. सर्व विकासकामे चिखली गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक व नागरी गरजांसाठी अत्यंत आवश्यक असून, या कामांमुळे परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे. तरी या सर्व विकासकामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच संबंधित विभागांना तातडीने आदेश देऊन ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com