

पिंपरी, ता. ७ ः औद्योगिक क्रीडा संघटनेच्यावतीने आयोजित ६२ व्या औद्योगिक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये शनिवारी भारत फोर्जने बजाज ऑटो ग्रीन संघावर ५ गडी राखून विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला. सामनावीर सूरज बोरावके याने तब्बल ५ विकेट घेतल्या.
सकाळच्या सत्रात बजाज ऑटो आकुर्डीच्या क्रीडांगणावर हा सामना झाला. तत्पूर्वी, शुक्रवारी झालेल्या सामन्यांत अल्फा लावलने फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सवर ५ विकेट राखून मात केली. हेमंत पाटील सामनावीर ठरला. फिलिप्स विरुद्धच्या सामन्यात एमक्युअर फार्मासिटिकल्सने ३ विकेट राखून विजय प्राप्त केला. शहाबाद सय्यद सामनावीर ठरला. जेसीबीने ॲम्युनिशन फॅक्टरी विरुद्ध खेळताना अवघ्या एका धावेने विजय खेचून आणला. विनोद भोई सामनावीर ठरला.
संक्षिप्त धावफलक
बजाज ऑटो ग्रीन ः १४.३ षटकांत सर्वबाद ६८ (सूरज बोरावके ५-१८, राहुल शिरसकर २-१७) पराभूत वि. भारत फोर्ज ः १४.४ षटकांत ५ बाद ७२ (संदीप कणसे २-६). फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स ः २० षटकांत ९ बाद १३६ - सोमनाथ अडागळे २९ (हेमंत पाटील ३-२१) पराभूत वि. अल्फा लावल ः १९.३ षटकांत ५ बाद १४० - हेमंत पाटील ३८, श्रीकांत नाणेकर ४९ (सूरज मंडले २-२५). फिलिप्स ः २० षटकांत ९ बाद १४० - प्रतीक लवळेकर ६६ (धनाजी पवार ४-१६, रितेश धाडवे २-१६) पराभूत वि. एमक्यूअर फार्मासिटिकल्स ः १७.२ षटकांत ७ बाद १४१ - शहबाज सय्यद ६९ (सतीश राठोड २-२१, समीर खतीब ३-३०). बजाज ऑटो, चाकण ः १८.३ षटकांत सर्वबाद ११३ - गोरक्ष जाधव ४७ (अनिल गझलकर २-१५, आदिल हुसेन ३-१४, योगेश सायबर ३-१५) पराभूत वि. टाटा टेक्नॉलॉजी ः १७.४ षटकांत ७ बाद ११४ - स्वप्नील मुंगेल ३६, कश्यप के. २७ (विश्वेश्वर भट ३-१३, इमरान शेख २-२०). जेसीबी ः २० षटकांत ८ बाद १३० - विनोद भोई ५५ (सचिन सरवान ३-२२, ज्ञानेश्वर जगदाळे ३-२०) वि.वि. ॲम्युनिशन फॅक्टरी ः २० षटके ९ बाद १२९ - शैलेश पाटील ५७ (उमेश विनोदे ३-२२, विनोद भोई २-१८). सँडविक एशिया ः २० षटकांत ७ बाद २२४ - विवेक अडकिते ५९, संग्राम गावडे ४६, (राहुल कुंभार राहुल २-३८) वि.वि. एनप्रो इंडस्ट्रीज ः २० षटकांत ८ बाद २०९ - सक्षम धांडे ५८, राहुल कुंभार ७७ (रमेश भोसले ५-३०).