पिंपरी कॉलेज कट्टा
कॉलेज कट्टा
---
उद्यम उत्सव २०२६ उत्साहात
(मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज येथे आयोजित ‘उद्यम उत्सव २०२६’ हा एकदिवसीय उद्योजकता कार्यक्रम यशस्वी झाला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची आवड निर्माण करणे व त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांना चालना देणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. चैतन्य खोलमकर, वंशिता रिजवानी, अनिता चावरे, संकेत उधाने यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. प्रकाश दीक्षित, प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, प्राचार्य डॉ. मनोज साठे आणि शैक्षणिक समन्वयक प्रा. डॉ. प्रसन्न चव्हाण (आयक्युएस), समन्वयक प्रा. धन्वंतरी नरवडे आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

