आव्वाज कुणाचा? माटे शाळेचा!

आव्वाज कुणाचा? माटे शाळेचा!

Published on

पिंपरी, ता. ८ ः ‘अरे आव्वाज कुणाचा ...?’ निकालाची उत्कंठा, उत्साह, नाव जाहीर होताच जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट... अशा उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकही रंगून गेले होते. निमित्त होते, ‘सकाळ एनआयई’ आयोजित आंतरशालेय नाट्यस्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे. यात पिंपरी चिंचवड विभागातून चिंचवड येथील व्ही. के. माटे हायस्कूल संघाच्या ‘निर्धार’ नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला.
‘सकाळ माध्यम समूहा’ने राबविण्यात येणाऱ्या ‘सकाळ एनआयई’ उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्याला वाव मिळावा, या हेतूने आंतरशालेय नाट्यस्पर्धेचे आयोजन केले होते. यात पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील शाळांनी जनजागृती व सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या नाटिका सादर केल्या. मातृमंदिर विश्‍वस्त संस्थेचे कार्यवाह मनोज देवळेकर, उपकार्यवाह सुधीर कुलकर्णी, कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक जयंत जाधव यांच्या हस्ते विजेत्या संघाना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उल्लेखनीय सहभाग राहिला. ‘सकाळ एनआयई’चे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल सराफ यांनी सूत्रसंचालन केले.

सविस्तर निकाल
पिंपरी चिंचवड सांघिक (कंसात नाटकाचे नाव)
प्रथम ः व्ही. के. माटे हायस्कूल, चिंचवड (निर्धार); द्वितीय ः ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी (पहाट); तृतीय ः अमृता विद्यालयम् निगडी, (शह); उत्तेजनार्थ ः एच. ए. विद्यालय पिंपरी (फिनिक्स), फत्तेचंद जैन विद्यालय चिंचवड (भावनांची पेटी).
उत्कृष्ट अभिनय ः दूर्वांकुर इंगळे (एच. ए. विद्यालय पिंपरी), काव्या साताळकर (व्ही. के. माटे हायस्कूल, चिंचवड), उत्कृष्ट दिग्दर्शन ः भार्गवी शिंदे, संकेत भोसले (व्ही. के. माटे हायस्कूल); उत्कृष्ट नेपथ्य ः व्ही. के. माटे हायस्कूल, चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com