शुभेच्छांसाठी हार-पुष्पगुच्छ नको; शैक्षणिक साहित्य द्या ः महापौर
पिंपरी, ता. ९ ः महापौरपदाच्या शुभेच्छा देताना कुणीही हार, पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू घेऊन येऊ नयेत. द्यायचेच असल्यास महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून उपयोगी ठरेल अशी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य किंवा अन्य शैक्षणिक वस्तू शुभेच्छा अथवा भेटीच्या वेळी आणाव्यात, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.
महापौरपदी निवड झाल्याने रवी लांडगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकजण पुष्पगुच्छ भेट देत आहेत. त्याबाबत महापौर लांडगे म्हणाले, ‘‘हार-पुष्पगुच्छ क्षणिक सन्मानाचे प्रतीक असले, तरी विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. या उपक्रमातून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत मिळणार आहे. शिक्षणासाठी आवश्यक मूलभूत साधनांची पूर्तता होण्यास हातभार लागणार आहे. औपचारिक शुभेच्छांऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गुंतवणूक करण्याचा हा सकारात्मक व सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आहे.’’
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बळ वाढावे, त्यांना आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे आणि समाजामध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असेही महापौर लांडगे यांनी आवाहन केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

