श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन चिंचवडला उत्साहात

श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन चिंचवडला उत्साहात

Published on

चिंचवड, ता.१० : संत श्री गजानन महाराज यांचा १४८ वा प्रगट दिन सोहळा चिंचवड येथील श्री गजानन सत्संग मंडळाच्या मंदिरात विविध धार्मिक अनुष्ठान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह संपन्न झाला. या आठवडाभराच्या उत्सवात दररोज अभिषेक, अर्चना, भजन, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात आले.
उत्सवाची सुरूवात पालखी सोहळ्याने झाली. पुढील दिवसांमध्ये बिल्वपत्र, तुलसी, दुग्ध व सुगंधी दूध अभिषेकासह विविध धार्मिक विधी पार पडले. दररोज दुपारी विविध भजनी मंडळांनी भजन सेवा सादर केली. मोहक रायकर, रोहिणी माने - परांजपे, ऋषिकेश महाराज चोरगे, उत्तम महाराज गाडे आणि कबीर महाराज अत्तार यांच्या कीर्तन व प्रवचनांनी वातावरण भक्तिमय झाले. अखंड पारायणाची समाप्ती, केशर दूध अभिषेक, नामगजर आणि कीर्तनानंतर रविवारी दुपारी बारा वाजता मुख्य सोहळा झाला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी स्वरनंदा प्रस्तुत ऋषिकेश रानडे व रमा कुलकर्णी यांच्या सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाने उत्सवाची शोभा वाढवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com