दोघांवर कोयत्याने वार करून माजवली दहशत

दोघांवर कोयत्याने वार 
करून माजवली दहशत
Published on

पिंपरी : भांडणाच्या रागातून दोघांवर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच कोयते, दांडके हवेत फिरवून परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार निगडी येथे घडला. विवेक उर्फ विकी विनोद सोनकांबळे व जुबेर नासिर शेख (दोघेही रा. निगडी) यांना अटक केली असून, श्रवण उर्फ सूरज शहाजी कुऱ्हाडे व एका अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी व त्याचा मित्र किरण काळे यांना शिवीगाळ केली. आरोपी विवेक व जुबेर यांनी फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. दरम्यान, फिर्यादीला वाचविण्यासाठी आलेल्या किरण यांच्यावर जुबेर याने कोयत्याने वार केला. तसेच इतर आरोपींनीही त्यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी कोयते व दांडके हवेत फिरवत दहशत माजवली.

कंपनीचा मेल आयडी असल्याचे
भासवून फसवणूक
पिंपरी : कंपनीचा मेल आयडी असल्याचे भासवून त्याद्वारे पाठविलेल्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास भाग पाडून ५५ लाख २५ हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार भोसरी येथे घडला. या प्रकरणी भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीत काम करणाऱ्या चाळीस वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीशी संपर्क साधून त्याने पाठविलेला मेल आयडी फिर्यादीच्या कंपनीला कच्चा माल पुरविणाऱ्या चीनमधील कंपनीचा असल्याचे भासविले. फिर्यादीची दिशाभूल करीत त्याने मेल आयडीद्वारे पाठविलेल्या बँक खात्यावर ५५ लाख २५ हजार ९७४ रुपये पाठविण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली.

दापोडीत तीन पिस्तूल जप्त
पिंपरी : दापोडी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून तीन पिस्तूल जप्त केले. ही कारवाई दापोडीतील पवना नदी घाटाजवळ करण्यात आली. या मुलाकडे शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ७० हजार रुपये किमतीचे तीन पिस्तूल व चार काडतूस जप्त केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com